August 8, 2025

ज्ञानप्रसार विद्यालयात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

  • मोहा – ज्ञान प्रसारक शिक्षण मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
    या तपासणीसाठी डॉ.प्रशांत जोशी तसेच डॉ. सौ.कल्याणकर यांनी विद्यार्थ्यांच्या व विद्यार्थीनींच्या आरोग्याची तपासणी करून आवश्यक असणाऱ्या विद्यार्थ्यांना औषधोपचार करण्यात आले.
    याप्रसंगी डॉ.जोशी व डॉ. कल्याणकर यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे तसेच चांगल्या आरोग्याचे महत्त्व पटवून दिले.
    याप्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश भाऊ मोहेकर, मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप पाटील तसेच उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुनील साबळे,प्रा.रोहित मोहेकर,प्रा.शेखर गिरी,प्रा.अमित जाधव, प्रा.श्रीमती प्रतिभा सावंत, प्रा.देवदत्त पाटील तसेच सहशिक्षक संजय मडके, सतिश मडके,संजय आडणे,जनार्दन भामरे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
error: Content is protected !!