August 8, 2025

स्वयं प्रकाशित व्हा ही बुध्दांची शिकवण- भिक्खु पय्यानंद थेरो

  • लातूर – तथागत भगवान बुद्धानी समस्त मानवी जीवनाला उद्देशून मानव कल्याणकारी शिकवण दिली आहे.भगवान बुध्द यांनी मानवाच्या कल्याणासाठीच सर्व स्तरावरील उपदेश दिले आहेत. मनुष्य व त्याचे मन जीवनातील मुख्य अंग आहेत. मनुष्याचे मन अत्यंत प्रगल्भ, वैचारिक, बौद्धिक स्तरावर विवेकी असणे गरजेचे आहे. मनुष्याचे ज्ञान हे परावलंबी न होता ते स्वकर्तुत्वाने स्वावलंबी असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मनुष्याने स्वकर्तुत्वाने ज्ञान मिळवले पाहिजे. या करिता भगवान बुद्ध यांनी अत्त: दीप भव अर्थात स्वयंप्रकाशित व्हा असा मौलिक उपदेश त्यांनी समस्त समाजाला दिला असे प्रतिपादन पू. भिक्खु पय्यानंद थेरो यांनी केले.
    दर रविवार,चलो बुद्ध विहार अभियानांतर्गत कुशिनारा बुद्ध विहार,म्हाडा कॉलनी,बाभळगाव रोड,लातूर येथे सामूहिक बुद्ध वंदनेचे आयोजन करण्यात आलेले होते.
    प्रारंभी सर्व उपस्थित उपासक उपासिका यांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुष्पाने,धुपाने,दिपाने पूजा झाली. त्यानंतर त्रिसरण पंचशील ग्रहण करून सामूहिक बुद्ध वंदना करण्यात आली. यावेळी बावीस प्रतिज्ञा,भारतीय संविधानाचे प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन देखील करण्यात आले.
    पुढे बोलताना भिक्खु पय्यानंद थेरो म्हणाले कि, मनुष्याने इतरांच्या बाबतीमध्ये आपले ज्ञान न व्यक्त करता केवळ आत्मज्ञान करून घेण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.आत्मज्ञान हे मनुष्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उपयुक्त आहे. स्वचिंतनाने मनुष्य योग्य-अयोग्य,सत्य-असत्य, चांगले-वाईट, ज्ञान-अज्ञान, लाभ-हानी अशा सर्वच गोष्टींची जाणीव करू शकतो. त्यामुळे मनुष्याने आत्मज्ञान व आत्मभान या दोन्ही गोष्टीची सिद्धता करणे महत्त्वाचे आहे, असेही ते धम्मदेसनेत म्हणाले.
    यावेळी सुनीता कसादे, बबीता कांबळे, शिलाताई ससाने, करुणा ताई कांबळे, सुरेखा कांबळे, शकुंतला बटनपुरकर, सरिता हरणे, कस्तुराबाई सुर्यवंशी, सत्यकला मोरे, नैना कांबळे, कांचन कांबळे, आम्रपाली सुर्यवंशी, कविता भालेराव, मनिषा वाघमारे, पंचशीला बनसोडे, अंजली सोनकांबळे, निर्मला थोटे, कांता काकडे, शामल कांबळे, सुमन उडानशिव, सरिता बनसोडे, दिलिप हरणे, उत्तम कसादे, विजय कांबळे, गौतम गायकवाड, सुर्यकांत कालेकर, राजाराम बटनपुरकर, प्राचार्य प्रशांत भोपणीकर, भानुदास कांबळे, राहुल सुर्यवंशी, संजय भालेराव, अर्जुन वाघमारे,ज्योतीराम लामतुरे, करन ओव्हाळ, सुधाकर कांबळे, अशोक कांबळे, चंद्रसेन भडके, अनिरुद्ध बनसोडे, ई. सह मोठ्या संख्येने बौद्धउपासक उपासिकांची उपस्थिती होती.
    यावेळी प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद धावारे यांनी केले तर आभार दयानंद बटनपुरकर यांनी मानले.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी महाविहार धम्म सेवक ग्रुपच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.
error: Content is protected !!