- धाराशिव (जिमाका) – अनुसूचीत जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत महा-डिबीटी पोर्टल प्रणालीवर शाळा व विदयार्थ्यांची अर्ज नोंदणीची प्रक्रीया सुरु आहे.या प्रक्रियेत जिल्हयातील १२.६६ टक्के शाळांच्या नोंदणीचे काम पुर्ण झाले आहे. १८६४ शाळापैकी २३६ शाळांनी महा-डिबीटी पोर्टल प्रणालीवर शाळा नोंदणी प्रक्रीया पुर्ण केली आहे. उर्वरीत १६०८ शाळांनी शाळा नोंदणीची कार्यवाही तात्काळ पुर्ण करावी.
- शिष्यवृत्ती योजना या म्यॅनुअली / ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात येत होत्या.परंतु सन २०२४-२५ पासून या योजना राबविण्यासाठी महा-डिबीटी पोर्टल प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.जिल्हयातील सर्व मान्यताप्राप्त शाळांनी www.prematric.mahait.org/login या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने कार्यवाही करावयाची आहे.
- इयत्ता ५ वी ते ७ वी व इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचीत जातीच्या मुलांमुलीसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना.इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या मुलां/मुलीसाठी राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना.इयत्ता १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी महर्षी विठ्ठल रामजी6 शिंदे परीक्षा शुल्क प्रदान योजना. इयत्ता १ वी ते १० मध्ये शिकणाऱ्या साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांसाठी मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजना.इयत्ता ९ वी ते १० मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना या आहेत.
महा-डिबीटी पोर्टल प्रणालीवर शाळा नोंदणी प्रक्रीयेनंतर विदयार्थ्यांचे अर्ज भरावयाची कार्यवाही शाळा मुख्याध्यापकांनी करावी.जेणेकरुन विदयार्थ्यांना मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ तात्काळ अदा करणे सोयीचे होईल.कार्यवाही न केल्यामुळे अनुसूचीत जातीचे विदयार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची राहील याची नोंद घ्यावी.असे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी देवदत्त गिरी यांनी कळविले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला