August 9, 2025

लातूर शहर महानगरपालिका नागरिकांना सुविधा देण्यास निष्क्रिय – विनोद कोल्हे

  • लातूर – शहरात विकासाच्या मुद्द्यावर निवडून येणारे आमदार अमित देशमुख यांनी लातूर शहरांमध्ये फेरफटका मारावा आपल्याला समजून येईल लातूर शहराचा किती विकास झाला आहे, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आपल्याला आढळतील, मोकाट जनावरे रोड वरती आढळतील, आठ दिवसाला लोकांना पिण्यासाठी पाणी भेटत आहे, घाणीचे साम्राज्य पसरले आहे,त्यामुळे मच्छर आणि डासांचे प्रमाण लातूर शहरात वाढले आहे लातूर शहर महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे.मच्छर आणि डासांमुळे डेंगू आजाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे वरील सर्व समस्या सोडवण्यासाठी लातूर शहर महानगरपालिका निष्क्रिय ठरत आहे, लातूर जिल्ह्याचे ऑनलाईन पालकमंत्री यांना तर लातूर साठी वेळच नाही लातूरच्या समस्या यांना माहितीच नाहीत सर्वसामान्य नागरिक या समस्येबाबत दररोज बोलत आहेत.परंतु कोणत्याही प्रशासनाचे याकडे लक्ष नाही
    या घाणीच्या साम्राज्यामुळे झालेले मच्छर आणि डासावर लवकरात लवकर उपायोजना जर केल्या नाहीत तर भीम आर्मी च्या वतीने लातूर शहर महानगरपालिकेच्या समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भिम आर्मी भारत एकता मिशन मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांनी दिला आहे.
error: Content is protected !!