August 9, 2025

श्री संत गजानन महाराज पालखीचे कळंब शहरात आगमन व उत्साहात स्वागत

कळंब ( माधवसिंग राजपूत ) – श्रीक्षेत्र शेगाव येथील श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे कळंब शहरात दिनांक ४ जुलै गुरुवार रोजी ५.३० वाजता आगमन होताच बीड, धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर मांजरा नदी पूल येथे कळंब शहरातील भक्तांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले व पालखीचे कळंब नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू तापडिया यांनी दर्शन घेतले व वारकऱ्यांचे स्वागत केले, कळंब पोलीस उपविभागीय अधिकारी संजय पवार पोलीस निरीक्षक रवी सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत कांबळे, उपनिरीक्षक रामहरीचाटे ,रामचंद्र बहुरे तसेच शहरातील मान्यवरांनी श्रीच्या पालखीचे दर्शन घेतले श्री क्षेत्र शेगाव येथून गजानन महाराज संस्थान ची पालखीचे श्रीक्षेत्र पंढरपूर कडे आषाढी वारीसाठी दिनांक १३ जून रोजी प्रस्थान झाले असून आज दिनांक ४ जुलै रोजी कळंब शहरात पालखीचा मुक्काम आहे या पालखीत ७०० वारकरी भगव्या पताका घेऊन मुखी हरिनामाचा गजर व विठ्ठल ,विठ्ठल — विठ्ठल माझा, मी —- विठ्ठलाचा भजन गायन करीत सहभागी आहेत दिंडीचे हे ५५ वे वर्ष आहे शहरातील मिरवणूक मार्गावर हजारो भक्तांनी ठिकठिकाणी दर्शन घेतले तसेच फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली कळंब नगर परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य स्वागत रांगोळी काढण्यात आली होती, तसेच भक्तांनी दिंडीतील वारकऱ्यांना केळी ,बिस्किट यांचे वाटप केले ही पालखी कळंब उपजिल्हा रुग्णालयासमोरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ,छत्रपती शिवाजी महाराज चौक, अहिल्याबाई होळकर चौक, मार्गे नगरपरिषद शाळा क्रमांक १ येथे मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचली रात्री उशिरापर्यंत महिला ,पुरुष, अबाल ,वृद्ध भाविक भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी होती मुक्कामाच्या ठिकाणी किर्तन सेवा संपन्न झाली येथील नारायणराव करंजकर कुटुंबीयांकडून बापूराव करंजकर यांनी प्रतिवर्षाप्रमाणे पालखीतील वारकऱ्यांसाठी भोजन व्यवस्था केली होती कळंब नगर परिषद मुख्य अधिकारी राजू तापडिया यांनी वारकऱ्यासाठी नगर परिषदेच्या वतीने पाणी, विद्युत व्यवस्था याचे नियोजन केले होते तसेच कळंब महाराष्ट्र नाभिक मंडळ कळंब शहर शाखेच्या वतीने वारकऱ्यांची मोफत दाढी ,कटिंग , मसाज सेवा केली.

.

error: Content is protected !!