पिंपळगाव डोळा – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त संतयोगी साधूबुवा महाराज मंदिर,पिंपळगाव डोळा येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.वाढदिवसाचे औचित्य साधून मंदिरास ११ आसनी पट्टी भेट देण्यात आली. या प्रसंगी कोर कमिटी सदस्य अविनाश खापे,युवा सेना तालुकाध्यक्ष ईश्वर शिंदे,महिला जिल्हाध्यक्ष भारतीताई गायकवाड,बाभळगाव उपसरपंच विजयश्रीताई वाघमारे, बाळासाहेब पवार,राजेंद्रभाऊ बारगुले,भीमाशंकर स्वामी,मंदिर ट्रस्ट अध्यक्ष नारायण यशवंत, तुकाराम दत्त,चंद्रकांत टेकाळे, संजय स्वामी,रामराजे गुजर, राजाभाऊ पांचाळ आदी उपस्थित होते.
मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पडला. मान्यवरांच्या हस्ते मंदिरास आसनी पट्टी सुपूर्द करण्यात आली.यावेळी मंदिराच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम स्तुत्य असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमात स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
More Stories
पिंपळगाव डोळा येथे अंबाबाई मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात
“जिल्हा परिषद निवडणुकीत मंगरूळ गटाचा अजेंडा:विकास की फक्त राजकारण?”
“स्वप्नातील घर” साकारले : पिंपळगाव (डोळा) येथे सदघर योजनेअंतर्गत सुभाष घोडके यांच्या घराचा भव्य शुभारंभ