कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कूल, आष्टाचे अभ्यासू व कर्तृत्ववान मुख्याध्यापक आनंद रामटेके यांनी दि.९ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्था,कळंब संचलित साक्षी कोचिंग क्लासेस,कळंब येथे सदिच्छा भेट दिली.
यावेळी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी निर्भीड संपादक सुभाष घोडके यांच्या लेखणीतून साकारलेला ‘संस्थामाता सुमनताई मोहेकर द्वितीय स्मृतिदिन विशेषांक’ आनंद रामटेके यांना कार्यकारी संपादक अविनाश घोडके यांच्या हस्ते भेट देऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करत शुभेच्छा व्यक्त केल्या.
या प्रसंगी शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वृद्धी,सामाजिक बांधिलकी आणि संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीविषयी सकारात्मक चर्चा करण्यात आली. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींनी एकत्रितपणे कार्य करून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रयत्न करावेत, असा आशावाद व्यक्त करण्यात आला. कार्यक्रम प्रसन्न वातावरणात पार पडला.
More Stories
पोलीस कुटुंबातील दोन्ही मुली डॉक्टर;खामसवाडीचा उंचावला मान
मोबाईलच्या अतिरेकाने संवाद हरवला;तरुणाई व्यसनाच्या विळख्यात – विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांचा इशारा
छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिक्रमणावर बुलडोझर;नगरपालिकेची धडक मोहीम सुरू