August 9, 2025

श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या दिंडीचे कळंब नगरीमध्ये भव्य स्वागत

कळंब – श्रीक्षेत्र अल्लीपूर (विदर्भ) शिवपुर येथून ज्यांचे जकयोगाने जगद्गुरु तुकाराम यांच्या गाथा जिवंत राहिल्या अशा थोर संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पालखी मार्गक्रमण करत पंढरपूरकडे पायदळ दिंडीचे आज रोजी दि.३/७/२४ दुपारी पाच वाजता कळंब नगरीमध्ये आगमन झाले असता सर्व वारकरी बंधूंचे मनोभावे स्वागत करण्यात आले. अलीपुर येथून निघालेली पायी दिंडीत वारकरी व महिला असे एकूण 90 भक्तगण असलेली संताजी जगनाडे महाराज दिंडी कळंब मध्ये आली असता सर्व तेली समाज बांधव यांच्याकडून दिंडीचे फटाक्यांच्या आतिषबाजीत अत्यंत भक्तिमय वातावरणात जोरदार स्वागत करण्यात आले.प्रारंभी पालखीचे प्रमुख सुरेश रावजी घुसे व विणेकरी यांचे स्वागत लिंगायत संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष सागर भैया मुंडे व डॉ.सुनील थळकरी यांनी स्वागत केले व दुसऱ्या दिवशी सकाळी अल्पोपहाराची व चहापाण्याची सोय संभाजी किरवे राजाभाऊ चालक व वारकऱ्यांना दैनंदिन वापरात येणारे किट चे वाटप अशोक फल्ले. यांच्यावतीने करण्यात आले यावेळी तेली समाज अध्यक्ष अशोक चिंचकर,कैलास बागल, बबन (आबा )फल्लै, शिवराज (बापू) पाटील, काशिनाथ आप्पा धुमाळ, शिवकुमार आप्पा राजमाने, मच्छिंद्र आप्पा साखरे, विश्वेश्वर नाना शिंगणापूरे, कथले युवक आघाडीचे यश सुराणा,गोकुळ बरकसे,काशिनाथ आप्पा चिंचकर, अशोक फल्ले, किरण फल्ले, रोहीत किरवे,विकी किरवे, संस्कार फल्ले, मनोज फल्ले, आदी समाज बांधवांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

error: Content is protected !!