लातुर – शहरातील श्रावस्तीनगर (विक्रमनगर) येथे प्रा.शिवशरण हावळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि कुसुम बानाटे,अध्यक्षा,श्रावस्ती महिला मंडळ यांच्या प्रमुख ऊपस्थितीत १० वी,१२ वी मधील गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे धुप,दिपं,पुष्पाने वंदन केले.ज्योती घारगावकरांच्या नेतृत्वाखाली बुद्ध वंदना घेतली.मग गुणवंत विद्यार्थी कु.संकेत शिवराज कांबळे,कु.प्रणाली सुनिल कांबळे,कु.सन्मेष महेंद्र जोगदंड,कु.अक्षता रवि माकेगावकर आणि कु.प्रज्ञा सुनिल कांबळे यांचा पालकासह फुलहार आणि धम्मग्रंथ भेट देवुन गौरव केला.यावेळी कु.रिया गोरे या छोटीने खुपच छान भाषण केले.तर प्रा.शिवशरण हावळे यांनी गुणवंतांना खुपच प्रेरक आणि याही पेक्षा जिवनात मोठे यश संपादन करण्यासाठी पंचसुत्री तत्वाचा अंगीकार करण्याचा सल्ला देत खुप खुप शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे संचलन व प्रास्ताविक करुन आभार मानताना विहाराचे सचीव प्रा.विलास घारगावकरांनी सर्वांनीच जिवनातील विकाराचे हरण करून कुशल कर्माचा संचय करत यशवंत,किर्तीवंत नि समृद्ध विचाराचा आदर्श नागरीक होण्याचे आवाहन केले.यावेळी मंगल धायगुडे,करुणा कांबळे,अल्का कांबळे,संजीवनी गुंजुरगे,अनुसया कांबळे,सुरेखा सवाई,विष्णुपंत सवाई,प्रभाकर करवंजे,सुर्यवंशी बाबा,गायकवाड सर,प्रा.प्रकाश आडसुळ,समाधान बानातटे,ऊज्वल घारगावकर,रमाईकार कु.डाॅ.वैभवी घारगावकर सह अनेक लहान मुलं ऊपस्थित होते.अतीशय ऊत्साहात,शांततेत,शिस्तीत कार्यक्रम संपन्न झाला.
More Stories
त्याग,समर्पण आणि प्रेरणेचा जागर;माता रमाई जयंती उत्साहात साजरी
आई-वडिलांमुळेच आपल्या अस्तित्वाची ओळख –डॉ.सुनील गायकवाड
खरोसा लेणी येथे माघ पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा;६५ धम्म अनुयायांचा सहभाग