August 8, 2025

तात्काळ केवायसी करण्याचे आवाहन

  • धाराशिव (जिमाका) – सप्टेंबर-ऑक्टोंबर 2022 मध्ये झालेल्य नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांची त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकासानीचे पंचनामे करण्यात आले होते. या पंचनाम्यानुसार 3 लाख 13 हजार 831 शेतकऱ्यांना 290 कोटी रुपयांचे अनुदान बँक खात्यावर वितरण करण्याची मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी जिल्ह्यातील 40 हजार 838 शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्यामुळे 32 कोटी रुपये निधी नुकसान भरपाईचा प्रलंबित आहे. या शेतकऱ्यांकडून विशिष्ट क्रमांकासह ई-केवायसी लवकरात लवकर करुन घेण्याची कार्यवाही सर्व तहसिलदारांनी करुन घ्यावी.बाधित शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरीत करण्याबाबत शासनाच्या पोर्टलवरुन यादी अपलोड करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.हजिमा अपलोड केल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना आपल्या गावातील तलाठ्याकडून विशिष्ट क्रमांक घेवून ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. तहसिल कार्यालयाकडून तलाठ्यामार्फत संबंधित ग्रामपंचायतीमध्ये विशिष्ट क्रमांकासह याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहे. ज्या बाधित शेतकऱ्यांनी अद्यापही ई-केवायसी केलेली नाही,त्यांनी तात्काळ जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जावून ई-केवायसी करुन घ्यावी,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी केले आहे.
error: Content is protected !!