August 8, 2025

10 वर्षांपूर्वी आधारकार्ड काढले असल्यास अपडेट करणे आवश्यक

  • धाराशिव (जिमाका) – प्रत्येक शासकीय कामकाजासह इतर सर्वच ठिकाणी आता आधार क्रमांक महत्वपुर्ण झाला आहे.नागरिकांना मिळालेला हा युनिक आयडी आहे. आधार क्रमांकावर अनेक कामे अवलंबून आहेत.आधार कार्डवर नागरिकांची अत्यावश्यक माहिती अपडेट असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक दहा वर्षाला आधारकार्ड अपडेट करणे आवश्यक आहे.
  • धाराशिव शहरासह जिल्हयातील बहुतांश नागरिकांनी आधार अपडेशन केलेले नाही.आधार अपडेशन अभावी अनेक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यासाठी दर दहा वर्षानी आधारकार्ड अपडेट करणे आवश्यक आहे.

    ज्यांचे आधार कार्ड काढून दहा वर्ष पुर्ण झालेली आहेत,त्यांनी त्यांचे आधारकार्ड अपडेट करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.दर दहा वर्षानी शरीरात होणारे बदल,नागरीकांचे होणारे स्थलांतर, वैयक्तिक माहितीमध्ये होणारे बदल, आधारसोबत लिंक केलेल्या मोबाईल क्रमांकात झालेला बदल, पॅनकार्डसोबत लिंक करण्यात आलेला आधार क्रमांक, आधारकार्डवरील फोटो,बदल झालेला पत्ता, हाताच्या बोटाच्या रेषा इत्यादी. आवश्यक माहिती आधारकार्डवर अपडेट करणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांचे आधारकार्ड काढून दहा वर्ष पुर्ण झालेली आहेत अशा सर्व नागरीकांनी वरीलप्रमाणे आधार कार्डवरील आवश्यक माहिती अपडेट करून घ्यावी.

  • *आधारकार्ड कोठे अपडेट केले जाते*
    उस्मानाबाद शहरासह जिल्हयातील पोस्ट कार्यालय,सीएससी केंद्र,बँक, महा ई -सेवा केंद्र चालकाकडील आधार केंद्र इत्यादी ठिकाणी आधारकार्ड अपडेट करण्यात येते.
    आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे –
    आधारकार्ड अपडेट करताना मतदान कार्ड,पॅनकार्ड,वीजेचे बील किंवा पत्ता दर्शवणारे ओळखपत्र इत्यादी. कागदपत्राची मूळ स्वरूपात आवश्यकता आहे.
  • पहिल्यांदा आधार कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –
    पहिल्यांदा आधारकार्ड काढण्यासाठी पॅनकार्ड,वीजेचे बील किंवा पत्ता दर्शवणारे ओळखपत्र इत्यादी. कागदपत्राची आवश्यकता आहे.
    *0 ते 5 वर्षाच्या मुलांचे आधार कार्ड काढणे*
    0 ते 05 वर्षाच्या बालकांचे आधार काढणे आवश्यक आहे.अशा बालकांची आधार नोंदणी अंगणवाडीत किंवा हॉस्पीटलमध्ये करण्यात येते.पाच वर्षानंतर आधारकार्ड अपडेट करून घ्यावे. 0-5 वर्ष बालकांचे आधारकार्ड काढताना पालकांचे आधार कार्ड अपडेट केलेले असणे आवश्यक आहे.
  • *मुलांचे आधारकार्ड कधी अपडेट करणे*
    मुलांचे आधारकार्ड वयाच्या पाच वर्षापूर्वी काढले असेल तर पाच वर्षानंतर अपडेट करावे लागते. त्यानंतर पाच ते पंधरा वर्ष अपडेट करण्याची आवश्यकता नाही.मात्र पंधरा वर्षानंतर पुन्हा मुलांचे आधारकार्ड अपडेट करणे आवश्यक आहे.
    *बँकेला लिंक करणे*-विविध शासकिय योजना जसे संजय गांधी निराधार अनुदान योजना, नैसर्गिक आपत्तीचे अनुदान,पीक विमा इत्यादी शासकिय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड अपडेट करून बँकेशी संपर्क करून आधारकार्ड बँक खात्यासोबत केवायसी करणे अनिवार्य आहे.
  • *आधार अपडेट करावयाच्या बाबी*
    नवीन आधार नोंदणी,अनिवार्य बायोमॅट्रीक अपडेशन,बायोमॅट्रीक अपडेशन, आधारकार्डवरील फोटो अपडेट करणे,पत्ता बदल करणे व इत्यादी.आधारकार्डवरील फोटो बदलणे,ई -आधार डाउनलोड करणे A4 कलर प्रिंट घेणे.अशाप्रकारे आधारकार्ड अपडेट करता येईल.तरी ज्यांनी 10 वर्षानंतरही आपले आधारकार्ड अपडेट केले नसतील त्यांनी आपले आधारकार्ड अपडेट करावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा आधारकार्डच्या नोडल अधिकारी शोभा जाधव यांनी केले आहे.
error: Content is protected !!