August 8, 2025

सलग दुसऱ्या दिवशीही अन्नत्याग व आत्मक्लेश करत मोबाईल टॉवरवर आंदोलन

कळंब ( माधवसिंग राजपूत ) – एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या व इतर मागणीसाठी कळंब बस आगारातील वाहक म्हणून सेवेत असलेले सचीनानंद
पुरी यांनी कळंब येथील बीएसएनएल कार्यालयाच्या प्रांगणातील २६० उंची फूट असलेल्या मोबाईल टॉवरवर २२० फुट उंचीवर दिनांक २७ जुलै रोजी सकाळी ९.३० दरम्यान चढून अन्नत्याग व आत्मक्लेश आंदोलन सुरू केले असून सलग दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरू आहे जिल्हाधिकारी सचिन ओंम्बासे, यांनी मोबाईल द्वारे पुरी यांच्याशी संपर्क केला तसेच एस .टी. महामंडळाच्या उस्मानाबाद विभाग उपमहाव्यवस्थापक चेतना खिरवाडकर यांनी आंदोलन स्थळी उपस्थित राहून पुरी यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क केला परंतु मुख्यमंत्र्यांशी याविषयी चर्चा करण्याची पुरी यांची मागणी आहे दरम्यान अधिकारी पातळीवर हालचाली सुरू असून मुख्यमंत्री विधिमंडळाच्या अधिवेशन कामात व्यस्त असल्याने त्यांचा संपर्क अद्याप होऊ शकला नाही दरम्यान राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून आंदोलन थांबवण्याची विनंती केली परंतु मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची पुरी यांची भूमिका ठाम आहे कळंब आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी पुरी यांच्या आंदोलनात पाठिंबा दिला असून याविषयीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळंब तहसीलदार मार्फत देण्यात आले आहे तसेच याची एक प्रत उस्मानाबाद विभाग नियंत्रक यांना देण्यात आले आहे काल अचानक पणे सुरू झालेल्या या आंदोलनामुळे महसूल प्रशासन, पोलीस ,एसटी महामंडळ अधिकारी यांची धावपळ झाली व पुरी याने टॉवर वरून उतरावे यासाठी प्रयत्न सुरू केले खबरदारीची उपायोजना म्हणून आंदोलनाच्या स्थळी तात्काळ अग्निशामकदल गाडी, रुग्णवाहिका यांना पाचारण करण्यात आले यानंतर नायब तहसीलदार राजू तापडिया, सहाय्य पोलीस निरीक्षक हनुमंत कांबळे ,एस. टी. महामंडळ उस्मानाबाद विभागीय कार्यालयाचे कामगार अधिकारी प्रमोद सुतार ,कार्यालयीन अधिकारी श्रीधर नेहरकर, कळंब बसआगार प्रमुख मिथुन राठोड बीएसएनएल अधिकारी ठाकूर सचिनानंद पुरी यांचे वडील ह .भ .प. अशोक महाराज पुरी ह भ प महादेव महाराज अडसूळ यांनी पुरी यांच्याशी संपर्क करून टॉवरवरून खाली उतरावे अशी त्यांना विनंती केली आहे. या परिस्थितीवर पोलीस निरीक्षक रवी सानप, नायब तहसीलदार राजू तापडिया, कळंब बसआगार व्यवस्थापक मिथुन राठोड, मंडळ अधिकारी मटके तलाठी व्यंकट लोमटे ,पोलीस पो.कॉ. श्रीराम मायंदे ,युवराज चेडे लक्ष ठेवून आहेत.

error: Content is protected !!