अंबाजोगाई – आधार मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा अंबाजोगाई चा 8 वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे हे होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून मराठा सेवा संघाचे प्रवक्ते शिवश्री संजय सुरवसे उपस्थित होते. त्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत गुणवंत विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराजांचे कार्य समजावून अध्यक्षीय समारोप करत असताना प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे ज्येष्ठ साहित्यिक यांनी विविध उदाहरणे देऊन राजर्षी शाहू महाराजांनी केलेले कार्य गुणवंत विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये उपयोगी पडेल अशा पद्धतीचे दाखले देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष ॲड.सुनील सौंदरमल यांनी केले. सूत्रसंचालन कार्यालयात अधीक्षक अशोक डोंगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राऊत यांनी केले. या कार्यक्रमासाठी असंख्य विद्यार्थी व पालक आणि संस्थेचे सभासद उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले