August 9, 2025

महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत

  • धाराशिव (जिमाका) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या दोन विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती,शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपुर्ती, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आदी योजनेचे सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील अर्ज भरण्याकरिता http://mahadbtmahit.gov.in हे संकेतस्थळ 11 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे.
    जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आपले शिष्यवृत्तीचे अर्ज http://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने भरून त्याची हार्ड कॉपी आपल्या महाविद्यालयाकडे जमा करावी.
    जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी अर्ज हे प्रस्तुत कार्यालयाकडे सादर करण्यापूर्वी छाननी करून शिष्यवृत्तीस पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज कार्यालयास सादर करावेत. आपल्या महाविद्यालयात प्रवेशित एकही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी. विहीत मुदतीत अर्ज सादर न केल्यास व त्यामुळे एखादा पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग जबाबदार राहणार नाहीत, असे आवाहन समाज कल्याणाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.
error: Content is protected !!