August 9, 2025

कळंब शहरात निघणार विशाल धम्म रॅली

  • भीमनगर -धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त दि.२४ ऑक्टोबर २०२३ रोजी कळंब शहरातील विविध भागांतून,नगरमधून सर्व बौद्ध अनुयायी हे शहरातील क्रांती भूमी असलेल्या भीमनगर येथून विशाल रॅली काढण्याचे ठरले.
    या विशाल रॅलीच्या नियोजनासाठी भीमनगर येथील बुद्ध विहारात आयु.मारुती दादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील बौद्ध अनुयायांची बैठक संपन्न झाली.
    या बैठकीत सर्वानुमते अशोका विजयादशमी निमित्त धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करुन बुद्ध विहार भीमनगर ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसर पर्यंत विशाल धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
    या बैठकीस भिमनगर, इंदिरानगर,समतानगर कल्पनानगर,सम्राटअशोकनगर इतर सर्वं नगर मधील बौद्ध उपासक उपासिका, बालक,बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी भिमाई महिला मंडळाची उपस्थिती ही लक्षणीय होती.
error: Content is protected !!