धाराशिव (जिमाका) – महाडीबीटी पोर्टलवरील महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले शिष्यवृती अर्ज ऑनलाईन फॉरवर्ड करण्याबाबत संबंधित महाविद्यालयांना आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित महाविद्यालयाच्या प्राचार्य व महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग जातीच्या विद्यार्थ्यांनी सन 2023-2024 या वर्षासाठी महाडिबीटी पोर्टलवर योजनेचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर भारत सरकार शिष्यवृत्ती,फ्री शिप व राजर्षि छत्रपती शाहू महाराज मेरीट शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल सुरू झाल्यापासून ऑनलाईन प्रणालीवर अर्ज नोंदणी व अर्जाची पडताळणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. 30 मे 2024 अखेर महाविद्यालय व विद्यार्थीस्तरावर वरील शिष्यवृत्ती अर्जाची संख्या मोठ्या प्रमाणात प्रलंबित दिसुन येत आहे.तरी सर्व प्राचार्यांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज अचूक पडताळणी करुन तसेच विद्यार्थी स्तरावरील अर्जाची त्रुटीपूर्तता करुन घेऊन प्रलंबित अर्ज 14 जुन 2024 पर्यंत परीपुर्ण अर्ज सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयास पाठवावे. 5 पेक्षा जास्त प्रलंबित अर्ज असलेल्या महाविद्यालयांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कै.प्रभाकर भस्मे कनिष्ठ महाविद्यालय,लोहगाव -5 अर्ज, जयप्रकाश विद्यालय -5 अर्ज,डॉ. आंबेडकर बालविकास शिक्षण संस्था, रुईभर संचालित,श्री स्वामी समर्थ आर्ट आणि सायन्स कॉलेज मुरुम प्रलंबित अर्ज संख्या -6,जय प्रकाश विद्यालय -5,माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी,,मुरुम -6, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अभियांत्रिकी महाविद्यालय, उस्मानाबाद -6, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी तंत्रनिकेतन,येडशी तालुका – येडशी -7,डॉ.के.डी.शेंडगे उच्च माध्यमिक शाळा,उमरगा -7,पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पदन पदविका विद्यालय,मु.वाशी फाटा, वाशी-7, सर्वोदय शिक्षण संस्था संचालित कृषी तंत्रनिकेतन वाशी-8, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ भाऊसाहेब बिराजदार वरिष्ठ महाविद्यालय-11, आनंद ग्राम कृषी विकास मंडळे महारुद्रप्पा मोटे कॉलेज ऑफ फार्मसी गीरवली तालुका भूम – 12,श्री साई जनविकास प्रतिष्ठानच्या सौ शारदादेवी पंडित पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट आळणी – 13,ज्ञानप्रबोधिनी सोलापूर संचालित कृषी तंत्र विद्यालय तोनराबा ता.लोहारा -14, नवीन उस्मानाबाद जिल्हा बालविकास समिती संचालित महानंदा बीएड कॉलेज -16,श्री.वेंकटेश उच्च माध्यमिक आश्रमशाळा घाटंगरी -17,मधुकरराव चव्हाण चँरीटेबल ट्रस्ट अनदुर सलगरा संचालित मधुशाली आर्ट,कॉमर्स आणि सायन्स कॉलेज -17, श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालय – 17, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ के.टी.पाटील बीएससी संगणक विज्ञान महाविद्यालय -18,जव्हार विद्यालय अणदूर – 18, शिवशक्ती संगणक विज्ञान महाविद्यालय -27,के.टी.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग – 47,श्री.छत्रपती शिवाजी जुनिअर कॉलेज उमरगा -116 असे एकूण 406 प्रलंबित अर्ज आहे.
तरी वरील महाविद्यालय स्तरावर अर्ज प्रलंबित असून पाचपेक्षा कमी अर्ज महाविद्यालय महाविद्यालयाची संख्या 150 आहे.महाविद्यालयस्तरावर अथवा विद्यार्थी लॉगिनवर अर्ज प्रलंबित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहील.या संदर्भाने भविष्यात शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्कबाबत इतर मागास बहुजन कल्याण विभाग जबाबदार नाही याची सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी व महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने गांभीर्याने नोंद घ्यावी.असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक यांनी कळविले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला