शिराढोण ( आकाश पवार)- शिराढोण हे कळंब तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून,येथील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. शिराढोणच्या मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात वाहन चालकांचे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.विशेषतः पावसाळ्याच्या तोंडावर, रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास ही स्थिती आणखी गंभीर होऊ शकते.”रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालवणे खूपच धोकादायक झाले आहे. अपघातांची शक्यता सतत भेडसावत असते,” असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.यापूर्वी खूप वेळा याच ठिकाणी मोठे-मोठे अपघात झाले आहेत.याकडे प्रशासनाचे कसलेही लक्ष दिसून येत नाहीत असे नागरिकांकडून प्रतिक्रिया आल्या.नागरिकांनी प्रशासनाला वारंवार विनंती करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पावसाळ्याच्या अगोदर रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे.कारण याच रस्त्याने शाळेचे विद्यार्थी,महाविद्यालयाचे विद्यार्थी,शिराढोण च्या प्रशासकीय कार्यालात दैनंदिन येणारे अधिकारी,कर्मचारी वर्ग येत असतो त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना केल्यास पावसाळ्यात अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल.
@ जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो –
मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून या रस्त्यावरून जाताना जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे जागोजागी रस्त्यावर खड्डे पडले असून ते खड्डे चुकवत असताना वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश