September 24, 2026

प्रा.देवदत्त सावंत यांना राष्ट्रीय धम्मसंगिती पुरस्कार २०२४ प्रदान

  • लातूर – येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, धम्म अभ्यासक तथा बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट, रामेगाव, लातूरचे सदस्य प्रा. देवदत्त सावंत यांना धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूरचा अत्यंत सन्मानाचा व प्रतिष्ठेचा राष्ट्रीय धम्मसंगिती पुरस्कार २०२४ राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व ग्रंथ देऊन प्रदान करण्यात आला.
    महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सारा भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पूर्ण 11करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत तथागत भगवान बुद्धाच्या धम्म विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करीत आहे. तथागत बुद्धांच्या विचारांचा जागर करण्यासाठी बुद्ध जयंतीच्या निमित्ताने दुसऱ्या सत्यशोधक विश्व धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत आपली सामाजिक बांधिलकी मानून करीत असलेल्या कृतिशील प्रबोधनाच्या चळवळीमधील कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी प्रा. देवदत्त सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली होती.
    दुसऱ्या सत्यशोधक विश्व धम्म परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत ऍड.कृष्णा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जेष्ठ लेखक तथा प्रसिद्ध विचारवंत लक्ष्मण माळी, भारतीय बौद्ध महासभेचे एस. पी. दीक्षित, निर्मिती प्रकाशनचे अनिल म्हमाने, पूजनीय भंदत शाक्यपुत्र संबोधि (थेरो), पूजनीय भंदत आर. आनंद, धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा करुणा विमल आदि मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रा. देवदत्त सावंत यांना प्रदान करण्यात आला.
    याप्रसंगी प्रा. शहाजी कांबळे, डॉ. नंदकुमार गोंधळी, किशोर खोबरे, प्रा. टी. के. सरगर, निती उघाडे आणि प्रा. देवदत्त सावंत यांची समायोजित भाषणे झाली.
    राष्ट्रीय धम्म संगिती पुरस्कार २०२४ पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. देवदत्त सावंत यांचे बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा धम्मगुरु पुज्यनिय डॉ. उपगुप्त महास्थवीर आणि सचिव पय्यानंद थेरो यांनी धम्मरूपी आशिर्वाद आणि प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे, प्राचार्य डॉ. संजय गवई, प्रा. प्रशांत लामतूरे, प्रा. संजय बिरादार, प्रा .उत्तम दोरवे, प्रा. राजकुमार बनसोडे, प्रा. विठ्ठल जाधव, अनिरुद्ध बनसोडे, उदय सोनवणे, मिलिंद धावारे, भाग्यश्री सावंत, ममता गवई आणि मित्र परिवाराने अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
error: Content is protected !!