कळंब – विचारांमधून आणि कृतिमधून जातीवाद संपविण्यासाठी सतत प्रयत्नाशील असणारे सावरकर जातीवादी होते हे म्हणणेच मुळात चुकीचे आहे. दलितांसाठी मंदिर बांधणारे आणि जेवणावळ घालणारे सावरकर जातीवादी कसे? “याच देशात राहणारे, याचं देशावर प्रेम करणारे सर्वजण हिंदू” असा विचार देणारे सावरकर मुस्लिमद्वेष्ठे म्हणून ठसविण्याचा वारंवार प्रयत्न काँग्रेस कडून केला गेला. उत्कट देशभक्ती मुळे दोन दोन जन्मठेप आणि घराची राखरांगोळी झालेला स्वातंत्र्यासेनानी जगाच्या इतिहासात क्वचितच झाला असेल. सावरकरांविषयी बोलताना केशव उपाध्ये यांनी अटलजींच्या कवितेचा उल्लेखही केला.मोदीजींचे सरकार सावरकरांच्याच स्वप्नातील भारताला समृद्ध करण्यासाठी व जातपात विरहित समाज निर्माण होण्याच्या प्रेरणेने काम करत असे प्रतिपादन केशव उपाध्येनी केले.
कळंब येथे दरवर्षी स्वातंत्र्यावीर सावरकर विचार मंचच्या वतीने आयोजित व्याख्यानात केशव उपाध्ये बोलत होते.
जयंती उत्सव समिती अध्यक्ष शिवाजी गिड्डे – पाटील यांनी प्रस्ताविक केले. स्वातंत्र्यावीर सावरकर विचारमांचचे अध्यक्ष मकरंद पाटील यांनी यावर्षी ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुला – मुलींसाठी अभ्यासिका सुरु करण्याचा मनोदय व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश काका भडंगे, संतोष भांडे, संताजी वीर, वनिता कटाळे, अशोक क्षीरसागर, नाना शिंगणापुरे, किरण फाल्ले, गजानन मुंडे, संदीप कोकाटे, अंजुम बागवान, अनिकेत कोकाटे, खांडेकर मामा, मुकुंद साखरे, दत्ता पौल आदींनी परिश्रम घेतले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष यशवंतराव दशरथ हे होते. प्रा. प्रफुल्ल पंचमहाळकर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार अविनाश खापे यांनी मानले.
More Stories
“कामगार चळवळीचा कणखर आधारवड हरपला” — अच्युतराव माने पाटील यांचे निधन
व्यावसायिक गणेश घेवारे यांना मातृशोक
भगवंताचे गुण संतांमध्ये दिसतात – ह.भ.प.अच्युत आंबीरकर महाराज