बीड – कोरोना संसर्गाच्या नंतर आमच्या कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती च्या महाराष्ट्र राज्यातील कार्यकर्त्यांनी या एकल झालेल्या महिलांसाठी काम करताना महिला व बालकल्याण विभागाच्या बालसंगोपन योजनेवर आम्ही सर्वांनी विशेष काम केले. बालसंगोपन योजना म्हणजे कोणत्याही प्रकारच्या एकल महिला किंवा पुरुषाच्या ०१ दिवसांपासून ते १८ वर्षे वयोगटातील मुला मुलींना प्रत्येकी शिक्षणासाठी महिन्याला २२५० रुपये एकाला मिळतात..या योजनेत सरकार मागिल १० वर्षांपासून ४२५ रूपये होते . कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या सन २०२० च्या लढ्यास यश येऊन सरकारने नंतर ११२५ रू केले. पण आम्ही सतत पाठपुरावा करून ती रक्कम २२५० करण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात जनरेटा दिला म्हणून सरकारने ४२५ चे २२५० रुपये केले अशी माहिती कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक श्री हेरंब कुलकर्णी यांनी दिली तसेच राज्यभरातील कार्यकर्त्यांनी या योजनेचा प्रचार करायचे सर्वांनी काम सुरू केले तेव्हा महाराष्ट्रात बालसंगोपन योजनेचा लाभ फक्त १६ हजार मुलांनाच मिळत होता.. शासन, अधिकारी, अंगणवाडी सेविका सामाजिक संस्था व आमचे कार्यकर्ते या सगळ्यांच्या प्रयत्नाने आज या योजनेत १ लाख ६ हजार मुलांना या योजनेचा प्रत्येक महिन्याला २२५० रुपयांचा प्रत्येक महिन्याला लाभ मिळतो आहे….हे खूप समाधानकारक आहे असेही हेरंब कुलकर्णी म्हणाले.
या योजनेचा प्रचार करण्यासाठी सविस्तर माहितीसह एक मोठा मेसेज करून संपर्कासाठी प्रत्येक जिल्ह्यातील एका कार्यकर्त्याचा मोबाईल नंबर दिला होता..त्यातून कार्यकर्त्यांना शेकडो फोन आले व त्यांनी फॉर्म भरायला मदत केली…श्रीरामपूर येथील मुकुंद टंकसाळे यांनी आजपर्यंत ५००० पेक्षा जास्त फोन घेतले आहेत. तसेच बीड जिल्ह्याचे समन्वयक बाजीराव ढाकणे यांनी जवळपास ३००० लाभार्थी या योजनेस जोडले आहेत. तसेच बाजीराव ढाकणे मागिल ४ वर्षापासुन सतत या योजनेचा प्रचार करण्यासाठी तत्पर असतात. दररोज फोन कॉल वर सविस्तर माहिती देण्यात तत्पर असतात सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत ते फोनवर फॉर्म कसा भरायचा कोठे फॉर्म द्यायचा कोणाला भेटायचे याविषयी मार्गदर्शन करत असतात… या सर्व प्रयत्नातून आज ९० हजार लाभार्थी वाढले आहेत.. ही संख्या अशीच वाढत राहील व वेगवेगळ्या कारणांनी एकल झालेल्या महिलांची या मदतीतून मुले शिकत राहतील..इतक्या कुटुंबांना मदत होऊ शकते. म्हणजे एकत्रितपणे केलेल्या कृत्याचा परिपाक आहे असे हेरंब कुलकर्णी म्हणाले. हे सर्वांचे सामूहिक यश आहे.. समाधान आहे. शासकीय योजनांचा प्रचार करणे हे सुध्दा मोठे काम असते हे या निमित्ताने लक्षात आले . आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी कोणतेही मानधन नसताना हे सारे काम केले आहे. हा आमच्या निर्भिड कणखर भूमिका असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांचा मोठेपणाच आहे.असे गौरव उदगार हेरंब कुलकर्णी यांनी काढले आहेत.
* बालसंगोपन योजनेच्या संदर्भात राज्यभरात अनेक अडचणी येत आहेत. काही ठिकाणी लाभार्थी बालकांचे प्रस्ताव स्वीकारले जात नाहीत तर काही ठिकाणी प्रस्ताव देऊन 2 वर्षे झाली आहेत तरीही बालकांना लाभ मिळालेला नाही. या योजनेसंदर्भात शासकीय पातळीवर पाहिजे तेवढ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नाही हि अतिशय वाईट परिस्थिती आहे.
– बाजीराव ढाकणे बीड जिल्हा समन्वयक साऊ एकल महिला समिती ,महाराष्ट् राज्य संपर्क – 9421989909
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश