सातेफळ – कळंब तालुक्यातील सातेफळ येथील सरुबाई नंदराज डोके यांचे अकाली निधन झाले. या निधनानंतर त्यांची रक्षा पाण्यात किंवा नदीत सोडून न देता त्यांची आठवण जतन करण्यासाठी आणि निसर्गातलं पाण्याचं प्रदूषण टाळण्यासाठी त्यांची रक्षा त्यांच्या शेतामध्ये आणि त्यांच्या माहेरातील आई-वडिलांच्या शेतामध्ये आंब्याची रोपे लावून त्यांच्या रक्षेचं विसर्जन केलं. शिवधर्माच्या शिकवणी प्रमाणे शिवधर्म प्रचारक भूमिपुत्र वाघ यांनी यांच्या आईच्या पासून सुरू केलेली ही परंपरा आता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय होत असताना दिसते आहे. दोन भावंडे जिवंत असताना सरुबाई डोके यांनी तीन वर्षापूर्वी आपल्या आईच्या निधनानंतर त्यांनी स्वतः शिकाळं धरून पाणी पाजलं होतं. सावित्रीमाता फुले यांनी सुरू केलेली परिवर्तनाची, स्त्री हक्काची, स्त्री अस्तित्वाची परंपरा त्यानी पुन्हा सुरु केली.सरूबाई डोके यांनी सावित्रीचे कार्य आपल्या जीवन कार्यामध्ये उतरविले होते. सरूबाई डोके यांचे निधन दिनांक 28 मे 2024 रोजी सातेफळ तालुका कळंब या राहत्या गावी झाले. त्यांची रक्षा नदी किंवा धार्मिक स्थळी इतरत्र कुठेही विसर्जन करता आंब्याची झाडी लावून स्मृती जतन करण्याचा निर्णय घेतला. आणि तो पूर्ण केला. त्यांच्या पश्चात लेक,लेकी सुना, नातवंडे,भावंडे असा मोठा परिवार आहे. या परिवर्तनाच्या वाटसरूला, गायिकेला, दोन हजार अभंग, गवळणी, भारुड, चारोळी मुखोद्गत असणाऱ्या कवियत्रीस लाख लाख प्रणाम.
More Stories
भगवान दहीरे यांचे दुःखद निधन
“परिवर्तन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ” पुरस्काराने कमलाकर शेवाळे सन्मानित
शिक्षणाचा प्रसार मराठवाड्यात करणारे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन