कळंब – उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून ओळख असलेल्या ज्ञान प्रसारक शिक्षण मंडळ येरमाळा या संस्थेचे संचालक म्हणून प्रा. डॉ. संजय कांबळे यांची नियुक्ती झाली आहे. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांनी ग्रामीण भागातील बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी 1952 मध्ये शिक्षण संस्थेची स्थापना केली आज या संस्थेअंतर्गत 21 युनिट चालविले जातात यात एक वरिष्ठ महाविद्यालय पाच कनिष्ठ महाविद्यालय एक एम.एस. व्ही.सी.कनिष्ठ महाविद्यालय,दहा माध्यमिक शाळा,एक प्राथमिक शाळा, दोन मुलांचे वस्तीगृह व एक मुलींचे वस्तीगृह याचा समावेश आहे.ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने प्रा.डॉ.संजय कांबळे यांचा शाल, श्रीफळ,बुके,पुष्पहार देऊन सत्कार केला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना प्रा.डॉ.संजय कांबळे यांनी आपल्या भाषणात संस्थेचे अध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांनी संस्थेचे संचालक म्हणून जबाबदारी दिली आहे. याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले व ज्येष्ठ नागरिकांनी माझा यथोचित सत्कार केला व शुभेच्छा दिल्या त्यांचे आशीर्वाद सदैव व कायम माझ्या पाठीशी आहेत त्याच्या बळावर पुढील यशस्वी वाटचाल सुरू आहे असे सांगितले. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ ,जिल्हा उपाध्यक्ष अच्युतराव माने, ज्येष्ठ विधीज्ञ त्र्यंबकराव मनगिरे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद चाऊस,शहराध्यक्ष मुसादेख काझी ,अनंत घोगरे ( काँग्रेस आय ) रिपब्लिकन सेना ,जिल्हाध्यक्ष अनिल हजारे ,निवृत्त मुख्याध्यापक उत्तम कांबळे, साहित्यिक रमेश बोर्डेकर ,कामगार नेते डी. टी.वाघमारे, विठ्ठल समुद्रे, भारत जाधव ,विलास करंजकर , पोपट साळवे ,मडके डी.बी. ,मधुकर शीलवंत ,कल्याण लोळगे, बंडू ताटे ,बशीर पठाण ,अनिरुद्ध पवार, विनायक दशरथ, दादा खंडागळे, सचिन क्षिरसागर यांचा समावेश होता सूत्रसंचालन माधवसिंग राजपूत यांनी तर आभार विलास करंजकर यांनी मानले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात