February 9, 2026

उत्तम आरोग्यासाठी हवे वनौषधी वनस्पतीचे संवर्धन – डॉ.प्रवीण महामेरू

  • डिकसळ – माणसाला जगताना अन्न वस्त्र निवारा याबरोबरच उत्तम आरोग्य आवश्यक आहे.यासाठी आयुर्वेदिक औषधे उपयोगी व प्रभावी ठरतात. त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत मात्र जंगलतोड मोठ्या प्रमाणावर होत आहे, पर्यावरणाचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन वनौषधी तज्ञ डॉ.प्रवीण महामेरू( आयुर्वेदाचार्य जालना) यांनी केले. वनस्पतीशास्त्र विभाग, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब आणि परिक्षेत्र सामाजिक वन विभाग कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने “दैनंदिन जीवनावश्यक औषधी वनस्पती जतन व संवर्धन” या विषयावर डॉ.प्रवीण महामेरू यांचे व्याख्यान दि. ६/१०/२०२३ (शुक्रवार) रोजी अटल आनंदवन घाण वन वृक्षलागवड उदघाटन प्रसंगी आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ,हरडा, अर्जुन ,अशोक, दुधी आगरडा, पारिजात ,शिसू, शिरीष, दूर्वा यासारख्या वनस्पतीची ओळख करून दिली.त्यानी शारीरिक समस्या कमी होतात तसेच अनेक दुर्धर आजार बरे होण्यासाठी वनौषधी वनस्पती गुणकारी असल्याचे सांगून ,वृक्षारोपण करताना कोणते वृक्ष उपयुक्त आहेत आहे ,त्यांची कोठे आणि कशी लागवड करावी? याची माहिती डॉ. प्रवीण महामेरू यांनी दिली. सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत औषधाचे दुष्परिणाम पाहता आयुर्वेद व योगाकडे लोकांचा मोठा कल आहे मग आयुर्वेदासाठी लागणारी फळे फुले आणणार कुठून ?हा मोठा प्रश्न उपस्थित करत या प्रश्नाचे उत्तर कोण देणार आहे असे ते म्हणाले, प्राचार्य डॉ.सुनील पवार अध्यक्षस्थानी होते ,आरोग्यदायी जीवनात विविध वनस्पतीचे महत्त्व समजून घेण्याचे आवाहन त्यांनी केले तसेच अटल आनंदवन व घनवन हा प्रकल्प राबवण्यासाठी वृक्षलागवडसाठी सहकार्य करणाऱ्या सामाजिक वनीकरण विभाग धाराशिव व परिक्षेत्र सामाजिक वन विभाग कळंब कर्मचारी यांचाही गौरव केला. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती मध्ये संस्थेचे संस्थेचे सचिव डॉ.अशोक मोहेकर तसेच उदघाटक विश्वास करे विभागीय वन अधिकारी धाराशिव, श्रीमती भाग्यश्री वटारे( मास्टर ट्रेनर पुणे) व संतोष दोडके (परिक्षेत्र वनविभाग ) धाराशिव हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.श्रीकांत भोसले(वनस्पतीशास्त्र विभाग) व श्री संतोष दोडके (परीक्षेत्र वन विभाग) यांनी केले,संचालन डॉ.दत्ता साकोळे,प्रास्ताविक प्रा.अर्चना मुखेडकर तर आभार डॉ.खोब्राजी पावडे यांनी मानले, यावेळी उपप्राचार्य डॉ. हेमंत भगवान, डॉ. सतीश लोमटे ,डॉ ज्ञानेश चिंते,डॉ.राठोड, डॉ ताटी पामुल,ग्रंथपाल अनिल फाटक, डॉ. साठे, डॉ .महाजन, डॉ .चादर, डॉ. मानेकर, डॉ. चंदनशिवे ,प्रा. शाहरुख प्रा सिंपले प्रा.टिपरसे मॅडम,हे उपस्थित होते.यात 150 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
error: Content is protected !!