August 9, 2025

१:३ प्रमाणे भरती करावी – संजय दुधगावकर

  • धाराशिव (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – पीडब्ल्यूडी, सीईएच्या अंतिम प्रतिक्षा यादीत उमेदवारांची संख्या रिक्त पदाच्या १:३ करुन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह मुंबई येथील सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अंभियंता र. रा. हांडे यांच्याकडे गुरुवारी (दि.१६) जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केली आहे.
    या निवेदनात दुधगावकर यांनी म्हटले आहे की, सन २०२३-२४ मध्ये पीडब्ल्यूडी, जेई-५३२, झेडपी जेई-१०१८, नगर परिषद जेई -३९१, पनवेल जेई-१६, डब्ल्यूआरडी सीईए-५२८, झेडपी सीईए-८९८, एमपीएससी २०२३-५००, डब्ल्यूसीडी जेई -६७०, पीएमसी जेई ११३, एमआयडीसी एई- १०७, जेई १७, सीडको एई १०१ अशा एकूण ५७८४ विभागाच्या परिक्षा झाल्या आहेत. तसेच डब्ल्यूआरडी जेई ८९७, बीएमसी एसई -२३६, बीएमसी जेई-२३३, टीपीए २५० प्लस, एटीपी-१५०प्लस, नाशिक एमएनसी, नागपूर एमएनसी यासाठी जाहीरात पुढील काही दिवसात येणार आहेत.
    वरील पेपर सर्व उमेदवारांनी दिले आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या परिक्षा निकालामध्ये एकाच उमेदवाराची विविध ठिकाणी निवड झाली आहे. उर्वरित परिक्षेत आणखीन बऱ्याच उमेदवाराची निवड होणार आहे. परंतू एक उमेदवार त्याच्या पसंती क्रमांकानुसार एकाच पदावर हजर राहु शकतो. त्यामुळे एकाच उमेदवाराची २,३ ठिकाणी निवड झाल्यामुळे आपल्या विभागात पीडब्ल्यूडी सीईए ची बरीचशी पदे रिक्त होणार आहेत. त्यासाठी अंतिम परिक्षा यादीत रिक्त पदांच्या १:३ प्रमाणात लावावी किंवा जोपर्यंत रिक्त जागा पुर्ण भरल्या जात नाहीत तोपर्यंत अंतिम प्रतिक्षा यादी अपडेट करत राहावी. अतिरिक्त गुणवत्ता यादीतील ज्या उमेदवाराची इतर ठिकाणी निवड झाली असेल व त्याला पीडब्ल्यूडी सीईए ही पोस्ट घ्यायची नसेल तर अशा उमेदवारांकडून ओपटिंग आँट फॉर्म भरुन घ्यावा, असे निवेदनात दुधगावकर यांनी म्हटले आहे.
error: Content is protected !!