धाराशिव (नेताजी जावीर ) – अखिल भारतीय छावा संघटनेच्या तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी सचिन बागल यांची निवड करण्यात आली आहे. छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके यांच्या हस्ते निवडीचे पत्र बागल यांना देण्यात आले. यावेळी छावा संघटनेचे जिल्हा सचिव ज्योतिराम काळे, तुळजापूर तालुकाध्यक्ष रवी साळुंके, सिद्धेश्वर देवस्थान समितीचे सदस्य बालाजी सातपुते यांच्यासह छावा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य