- धाराशिव (जिमाका) – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायदयानुसार दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना 25 टक्के मोफत प्रवेशाची कार्यवाही 17 ते 31 मे 2024 या कालावधीत सुरु आहे.पालकांनी अर्जामध्ये अचुक व खरी माहिती भरावी.निवासस्थानाचे लोकेशन अचूक नोंदवून 10 शाळांची निवड करावी
पालकांना 17 ते 31 मे-2024 पर्यंत आर.टी.ई 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन https://student.maharashtra.gov.in/adm_portal या लिंकवर नोंदणी करता येईल.पालकांनी अर्जामध्ये निवासाचा पत्ता,जन्म तारखेचा दाखला,जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र,फोटो आयडी, दिव्यांग प्रमाणपत्र इत्यादी माहिती अचुक व खरी भरावी.पालकांना ऑनलाईन प्रवेश मिळाल्याचा SMS प्राप्त होताच अलॉटमेंट लेटर पालकांच्या Login वरून स्वतः प्रत घेवून गटशिक्षण कार्यालय पडताळणी समितीकडे अर्ज व सहपत्रे पडताळणीसाठी सादर करावीत.
वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,वि.जा.(अ) भटक्या जमाती (ब),भटक्या जमाती (क),भटक्या जमाती (ड), इतर मागासवर्ग (OBC),विशेष मागास प्रवर्ग (SBC) आर्थिक दृष्टया मागास घटक प्रवर्गाचा व दिव्यांग बालकांचा समावेश करण्यात आलेला आहे. एच.आय.व्ही.बाधित/एच.आय.व्ही. प्रभावित बालकांचाही या योजनेसाठी समावेश करण्यात आला आहे.
दुर्बल गटामध्ये ज्या बालकांच्या पालकांचे / ज्या बालकांचे पालन पोषण करणा-या व्यक्तीचे उत्पन्न 1 लाख रुपयांच्या आत आहे अशा बालकांचा समावेश होत आहे.निवासी पुरावा म्हणून निवासी पुराव्याकरिता रेशनिंग कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स, वीज/टेलिफोन देयक,प्रॉपर्टी टॅक्स देयक/घरपटटी, राष्ट्रीयकृत बँक पासबूक,आधारकार्ड,मतदान ओळखपत्र,पासपेर्ट इ.यापैकी कोणताही एक पुरावा ग्राहय धरावा. यापैकी उपलब्ध नसेल तरच दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदनीकृत भाडे करारनामा.फॉर्म भरण्याच्या दिनांकापूर्वीचा 11 महिण्याचा किंवा त्यापूर्वीचा जास्त कालावधीचा असावा.जन्मतारखेचा पूरावा बालकाचे वय 6 अधिक गृहीत धरताना मानीव दिनांक 31 डिसेंबर निश्चित करण्यात आला आहे.वंचित संवर्गासाठी जातीचे प्रमाणपत्र
दुर्बल संवर्गासाठी पालकांचे सन 2022-23 किंवा 2023-24 वर्षाचा उत्पन्नाचा तहसीलदार यांचा दाखला.विधवा,घटस्फोटीत व आई अथवा वडील यापैकी कोणताही एक पर्याय पालकत्व म्हणून असेल तर त्यांचा पुरावा.
राज्यस्तरावरुन लॉटरी काढल्यानंतर पालकांना एसएमएस येतो.परंतु त्याच्यावर अवलंबून न राहाता आरटीई पोर्टलवरील सुचनांचे पालन करावे.आरटीई मोफत 25 टक्के प्रवेश योजनेचा इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेशाचा जास्तीत जास्त पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशोक पाटील यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला