August 9, 2025

यशाचे श्रेय विद्यार्थ्यांची मेहनत,पालकांची चिकाटी, व शिक्षकांचे परिश्रम यांना जाते- रमेश आडसकर

  • केज (माधवसिंग राजपूत ) –
    केज येथील शारदा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्ड नवी दिल्ली यांच्यावतीने मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षा प्रमाणे उल्लेखनीय संपादन केले. शाळेमध्ये सर्वप्रथम येण्याचा मान पवन लक्ष्मण डोईफोडे याने 95% टक्के गुण घेऊन मिळवला तर सर्व द्वितीय सोळंके आदिती 94% तर तृतीय स्वानंदी जावळे 93% यांनी यश संपादन केले.तसेच शाळेच्या 9 विद्यार्थ्यांनी 90% च्या पुढे गुण मिळवले असून 35 विद्यार्थ्यांनी 80% च्या पुढे गुण मिळवले आहेत.
  • शाळेच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा शाळेमध्ये दि.१७ मे २०२४ रोजी शारदा इंग्लिश स्कूलचे सर्वेसर्वा रमेशराव आडसकर यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेच्या संचालिका तथा शाळेच्या मार्गदर्शिका अर्चनाताई आडसकर या प्रामुख्याने उपस्थित होत्या. शाळेचे प्राचार्य सोनल मिश्रा तसेच केज शहरातील प्रतिष्ठित पालक वर्ग उपस्थित होता.
    सर्वप्रथम यशस्वी विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार रमेश आडसकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना रमेश आडसकर यांनी अत्यंत अल्पावधीत शाळेने अनेक यशाचे शिखरे गाठले असल्याचे सांगताना शाळा स्थापने मागचा चा उद्देश हा केवळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे मिळावे हा असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी पालकांच्या अपेक्षांची पूर्तता करणे गरजेचे असल्याचे सांगताना येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी अपार मेहनत घेऊन पालकांचे,शाळेचे तसेच आपल्या परिसराचे नाव निश्चितच उंचावतील अशी अपेक्षा व्यक्त केली. थोड्या कालावधीची मेहनत ही पूर्ण आयुष्याच्या सुखाची गुरुकिल्ली असून मेहनत न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आयुष्य खडतर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सर्वांनी अभ्यास करून यश संपादन करावे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
    शारदा इंग्लिश स्कूल केज ही शाळा ग्रामीण भागात स्थापन करून बीड जिल्ह्यातील   सीबीएसई शाळेच्या तुलनेत अत्यंत कमी फीस मध्ये दर्जेदार शिक्षण देण्याचे व ग्रामीण भागातील मुला-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा सातत्याने आमचा प्रयत्न असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.
    वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे शाळेचे इयत्ता दहावीचे परीक्षा केंद्र अंबाजोगाई येथे आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी मेहनत करून दोन वर्ष कोरोना काळात शाळा बंद असतानाही विद्यार्थ्यांनी चिकाटीच्या जोरावर अभ्यास करून यश मिळवल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.  केज,कळंब व धारूर या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कोटा (राजस्थान) किंवा इतर मोठ्या शहराकडे न जाता तशाच प्रकारचे किंबहुना त्याहूनही जास्त दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शारदा इंग्लिश स्कूल केज व कळंब येथे शिक्षण घ्यावे असे मत पालक काकडे यांनी व्यक्त केले.
  • यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी पालक वर्ग व सर्व उपस्थित भावनाविवश झाल्याचे दिसले.
  • कार्यक्रमाचे आरंभी शाळेचे प्राचार्य सोनल मिश्रा यांनी शाळेच्या यशाचा आलेख समोर ठेवताना शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती पालकांना दिली.
    याप्रसंगी पालकांनी आपले विचार व्यक्त करताना संस्थेचे,शाळेचे व शिक्षकांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन गोरे यांनी करून कार्यक्रमाचा व समारोप केला.
error: Content is protected !!