कळंब (राजेंद्र बारगुले) – महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशनचे संस्थापक सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते संत सुफी शमशोद्दीन सय्यद यांच्या ४८ व्या वाढदिवसानिमित्त विविध संघटनांच्या वतीने अभिष्टचिंतन दि.११ मे २०२४ रोजी कळंब येथील श्रीराम ऑफसेटवर सा. साक्षी पावन ज्योत परिवाराच्या वतीने संपादक सुभाष घोडके यांच्या हस्ते सा.साक्षी पावनज्योतचा विशेषांक देवून यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी निवासी संपादक श्रीराम खापे, पत्रकार राजेंद्र खडबड, राजाभाऊ नान्नजकर आदींचे प्रमुख उपस्थिती होती.
मोहा येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन हनुमंत मडके यांच्या नेतृत्वाखाली शि.म.ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेटच्या मुख्य शाखेत ह.भ.प महादेव महाराज अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली मल्टीस्टेटचे कार्यकारी संचालक विशाल मडके यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहाराने सत्कार करून केक कापण्यात आला. या प्रसंगी अशोक मडके, विशाल मडके, ह.भ.प महादेव महाराज, ह.भ.प बापू जोशी, सा.साक्षी पावन ज्योत संपादक सुभाष घोडके आदींनी मनोगतातून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाची प्रस्तावना बापू जोशी यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीकांत मडके यांनी व आभार इमरान शेख यांनी मानले. सत्कारमूर्ती संत सुफी शमशोद्दीन सय्यद यांनी माझ्या सासरवाडीत झालेल्या सन्मानामुळे जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली असल्याचे सांगितले.
या प्रसंगी कुंभार सर, कर्मचारी वृंद उपस्थित होता. मोहा येथील हजरत सय्यद अलवी रहेमतुल्ला आलय यांना फुलांची चादर अर्पण करून शमशोद्दीन सय्यद यांच्या दीर्घायुष्यासाठी समशोद्दीन सय्यद, ह.भ.प महादेव अडसूळ महाराज,संपादक सुभाष घोडके, पत्रकार परमेश्वर खडबडे आदींनी प्रार्थना केली.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले