August 9, 2025

ज्येष्ठ पत्रकार अनंत आडसूळ यांना पितृशोक

  • कळंब – तालुक्यातील ईटकुर येथील ज्येष्ठ नागरिक गुणवंत तात्याबा अडसूळ उर्फ आण्णा यांचे शनिवारी सायंकाळच्या सुमारास वार्धक्याने निधन झाले आहे. मृत्युसमयी त्यांचे ७८ वर्षे वय होते.
    ते पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार अनंत आडसूळ, संशोधक डॉ. मुकुंद अडसूळ यांचे वडील होत. स्व.गुणवंत अडसूळ हे महानुभाव पंथाचे अनुयायी होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, एक बहिण, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
error: Content is protected !!