August 9, 2025

कळंबच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय स्क्वॅश स्पर्धेसाठी निवड

  • कळंब – धाराशिव येथे नुकत्याच संपन्न झालेल्या लातूर विभागीय शालेय स्क्वॅश रॅकेट क्रीडा स्पर्धेमध्ये कळंब येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च मा. विद्यालयाच्या तीन खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत प्राविण्य प्राप्त केले.
    १९ वर्ष मुलांच्या गटातून अमोल संजय गायकवाड यांनी तृतीय क्रमांक तर मेंढापूरकर प्रथमेश प्रशांत याने पाचवा क्रमांक प्राप्त केला तर १७ वर्षीय मुलींच्या गटातून मोरे आस्था परमेश्वर हिने चतुर्थ क्रमांक प्राप्त केला हे तिन्ही खेळाडू राज्यस्तरीय शालेय स्क्वॉश स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.पुढील महिन्यात पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत ते लातूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.यांना सहशिक्षक परमेश्वर मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
    या विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने प्राचार्य जयचंद कुपकर, उपप्राचार्या श्रीमती मीनाक्षीताई शिंदे, उप मुख्याध्यापक जे.एन. पठाण सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
error: Content is protected !!