August 9, 2025

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात महाराष्ट्र आणि कामगार दिन उत्साहात संपन्न

  • लातूर (दिलीप आदमाने ) – श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथे महाराष्ट्र आणि कामगार दिन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला.
    या कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी पुष्पहार अर्पण करून सर्वांच्या उपस्थितीमध्ये विनम्र अभिवादन कले. यावेळी उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, उपप्राचार्य प्रा. बालाजी जाधव, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे आणि कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    त्यानंतर प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर संगीत विभागाचे प्रा. विश्वनाथ स्वामी, प्रा. गोविंद पवार, प्रा. सरस्वती बोरगावकर आणि विद्यार्थिनींनी महाराष्ट्र आणि राष्ट्रभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
    यानंतर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी मतदारांसाठी प्रतिज्ञा सर्वांना देऊन महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
    त्यानंतर विद्यार्थी अभ्यासिकेमध्ये झालेल्या शुभेच्छापर कार्यक्रमांमध्ये मागील ४२ वर्षापासून महाविद्यालयाच्या ध्वजारोहणाची पूर्वतयारी करणारे दिलीप स्वामी, संगीत विभागाचे प्रा. विश्वनाथ स्वामी, प्रा. गोविंद पवार, प्रा. सरस्वती बोरगावकर, डॉ. बाळासाहेब गोडबोले, रमेश राठोड, संयोजन समितीतील सदस्य आणि संगीत विभागातील विद्यार्थिनींचे महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन डॉ. बाळासाहेब गोडबोले यांनी केले तर आभार कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांनी मानले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!