कळंब (विशाल पवार ) – महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त कळंब शहरातील छत्रपती संभाजी राजे नगरातील धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात दि.१ मे २०२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी,संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
भारतीय ध्वजाचे भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत पवार,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके, प्रा.मोहिनी शिंदे,प्रा.सागर पालके,निदेशक विनोद जाधव,निदेशक अविनाश म्हेत्रे, विनोद कसबे,निदेशिका कोमल मगर,सोनाली ढमाले आदींची उपस्थिती होती.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी