धाराशिव – बोधिसत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले आणि तथागत भगवान बुध्द यांच्या जयंतीनिमित्त त्रिरत्न बौद्ध महासंघ धाराशिवच्या वतीने जिल्ह्यास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात जिल्ह्यातील ४८२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य भारतीय संविधान,बौद्ध धम्म व म.फुले या विषयावर बहुपर्यायी प्रश्नांची ही स्पर्धा होती.या करिता सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेतील जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक सात हजार रुपये,द्वितीय पाच हजार रुपये व तृतीय तीन हजार रुपये प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असून तालुकास्तरीय प्रथम पारितोषिके दीड हजार रुपये,द्वितीय एक हजार रुपये तृतीय पाचशे रुपये प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असून सदर बक्षीस वितरण समारंभ दि. २३ मे बुद्ध पौर्णिमेनिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे.जिल्ह्यातील या ठिकानच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.लोहारा ६७,जेवळी ४७, राजेगाव ६२,आष्टा कासार ३७, उमरगा मलंग विद्यालय ६६, बहुजन हिताय ६९, उस्मानाबाद ३६,कळंब १६, भूम २६,नळदुर्ग १७,सलगरा दिवटी २७ वाशी २९ अश्या एकूण ४८२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.ही स्पर्धा संपूर्ण जिल्हाभरातून एकाच वेळी घेण्यात आली. यामधून विद्यार्थी वाचनप्रिय व्हावा आणि चरित्र अभ्यासाने सामाजिक बांधिलकीची जाण यावी हा उद्देश आहे. स्पर्धेकरिता त्रिरत्न बुद्धिष्ट सेंटरचें चेअरमन धम्मचारी रत्नपालीत,सचिव धम्मचारी ज्ञानपालित, धम्मचारी प्रज्ञाजित,धम्मचारी विबोध, धम्मचारी धम्मभूषण धम्ममित्र प्रा.प्रदीप गायकवाड,महादेव भोसले,हरिदास कांबळे,अशोक सावंत,तेजस्विनी गायकवाड, प्रीती मनोहर,अजिंक्य कांबळे, सुनीता कांबळे,पंकज गवळी,सचिन सरवदे,रामदास गायकवाड,एम.ए.सावंत मॅडम,सिद्धार्थ सावंत,अमोल सरवदे आदींनी परिश्रम घेतले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला