लातूर (दिलीप आदमाने) – माणसाच्या चेतनेचा विकास करणे व त्याच्या आयुष्याला समृद्ध करणे हेच साहित्याचे खरे प्रयोजन आहे असे प्रतिपादन डॉ.अनिल जायभाये यांनी केले.निमित्त होते शब्दपंढरी प्रतिष्ठान व जयक्रांती महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या साहित्यावर बोलू काही या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अनिलकुमार जायभाये,मंचावर शब्दपंढरी प्रतिष्ठानचे कवी योगीराज माने, शैलजा कारंडे, माने,डॉ.नीलेश नागरगोजे, याप्रसंगी शैलजा कारंडे यांनी कवितावाचन तर डॉ.नीलेश नागरगोजे,डॉ.केशव आलगुले, यांचे प्रमुख उपस्थित होती.यावेळी शैलजा कारंडे यांनी त्यांच्या गझलांचे वाचन करून सभागृहात उपस्थित श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरेही दिली.कवितेमुळे माझ्या जगण्याला अर्थ प्राप्त झाल्याचे मत शैलजा कारंडे यांनी व्यक्त केले तर गझलेमुळे माझ्या आयुष्याचा प्रवास आनंददायी झाल्याचे प्रतिपादन डॉ.नीलेश नागरगोजे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी योगीराज माने,,सूत्रसंचलन दयानंद बिराजदार तर आभारप्रदर्शन देवदत्त मुंढे यांनी केले.कार्यक्रमास लातूर व परिसरातील साहित्यिक,कवी व साहित्यप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. धीरज कोतमे,अमित भालके,इब्राहीम सय्यद,मयूर आवळे व रामदास जाधव यांनी परिश्रम घेतले.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे