कळंब – शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठ स्तरावर स्वायत्त महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० ची अंमलबजावणी सुरु करण्यांत आलेली असून, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सर्व अकृषि विद्यापीठांशी सलग्नित सर्व महाविद्यालयामधील पदवी अभ्यासक्रमांच्या तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, त्यासाठी महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना राज्यात राबविण्यांत येणा-या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० मधील शैक्षणिक बदलांबाबत व त्याच्या सकारात्मक परिणामाबाबत जागृती होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे चे मा. कुलगुरू प्रा. (डॉ.) कारभारी विश्वनाथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली “स्कुल कनेक्ट” (NEP कनेक्ट) अभियान राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब येथील विद्यार्थ्यांकरिता दि. २५ एप्रिल, २०२४ रोजी सकाळी ११.०० ते ०१.०० या वेळेत “स्कुल कनेक्ट” (NEP कनेक्ट) कार्यशाळा ऑनलाईन प्रणाली मार्फत यशस्वीरित्या संपन्न झाली.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉ. ए. पी. शेष, इंग्लिश विभाग प्रमुख, प्रा.गणेश काळे व प्रा.गणेश सूर्यवंशी यांनी ऑनलाईन प्रणाली मार्फत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मधील विद्यार्थी केंद्रित शैक्षणिक बदलांबाबत जसे मल्टीपल एन्ट्री मल्टीपल एक्झीट, बहुशाखीय विषय निवड पद्धत व लवचिक अभ्यासक्रम, नविन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाविद्यालयीन स्तरावर होणारे बदल, भारतीय ज्ञान परंपरा, अकँडमीक बँक ऑफ क्रेडीट, स्वयंम प्लँटफार्म वरील ऑनलाइन अभ्यासक्रम व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मुळे होणाऱ्या सकारात्मक परिणामाबाबत संवाद साधला. तसेच विद्यापीठ अंतर्गत कार्यरत इन्क्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नविन खंडारे यांनी विद्यापीठ अंतर्गत कार्यरत इन्क्युबेशन सेंटर व उपलब्ध सोई-सुविधा बाबत विद्यार्थ्यांना अवगत करून त्यांना उद्योजकीय प्रवाहात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. श्रीमती. उमा संदेल, शाखा प्रमुख, स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी विद्यार्थ्याना शैक्षणिक कर्ज योजना याबद्दल माहिती दिली. तसेच विद्यापीठाचे माजी विद्यार्थी संकेत चवरे यांनी विद्यापीठामार्फत विद्यार्थ्याच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली. या कार्यक्रमात ७० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन अरविंद शिंदे, सहाय्यक ग्रंथपाल, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अरविंद किवळेकर, कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, डॉ. एस. एल. नलबलवार, अधिष्ठाता- शैक्षणिक व संचालक, DBATU फोरम ऑफ इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड एंटरप्राइझ यांनी वेळोवेळी आवश्यक सहकार्य केले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले