August 8, 2025

खामसवाडी येथील आशिष बंडगर प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यात दुसरा

  • कळंब (जयनारायण दरक) – कळंब तालुक्यातील खामसवाडी शाळेतील विद्यार्थी राज्य आणि केंद्रात झळकले आहेत. या मध्ये इयत्ता पहिलीतील विद्यार्थी अशिष शिवाजी बंडगर राज्यात दुसरा आला आहे.तर इयत्ता दुसरी मधील विद्यार्थीनी अक्षता नितीन बाबर हिचा केंद्रात प्रथम क्रमांक, इयत्ता दुसरी ची आकांक्षा काकासाहेब बाबर हिचा केंद्रात पाचवा क्रमांक आला आहे. तर इयत्ता तिसरी मधील विद्यार्थीनी रुधीरा गोपाळ शेळके हिचा केंद्रात तेरावा क्रमांक आला.तसेच इयत्ता चौथीमधील विद्यार्थीनी स्वराली भागवत शेळके हिचा केंद्रात दुसरा क्रमांक, आरव अमोल शेळके केंद्रात तिसरा क्रमांक, अम्रता अमोल रोहिले केंद्रात सहावा आणि प्रिया दिनेश शेळके हिचा केंद्रात अकरावा क्रमांक आला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन होत आहे.
error: Content is protected !!