August 8, 2025

ह.भ.प.बळीराम कवडे महाराज वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

  • कळंब (महेश फाटक ) – राज्य परिवहन महामंडळाच्या कळंब आगारातील कर्तव्यदक्ष वाहक तथा संस्कृत भाषा चे गाढे अभ्यासक आणि सांप्रदायिक क्षेत्रातील नामवंत ह. भ. प. बळीराम कवडे महाराज यांचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस साक्षी पावन ज्योत परिवाराकडून दिनांक २७ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ०९.०० वाजता ह.भ. प.महादेव महाराज आडसुळ यांच्या अध्यक्षतेखाली बस स्थानकात साजरा करण्यात आला.
    या प्रसंगी संपादक सुभाष द.घोडके यांच्या हस्ते स्नेहबंधाची शाल आणि पुष्पहार घालून सत्य घटनेवर आधारित असलेली सुभाष घोडके लिखित “साक्षी” कादंबरी व साक्षी पावन ज्योत चा अंक देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी वाहक पी.सी. काळे,वाहतूक नियंत्रक कल्याण कुंभार, इंगोले सर,सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक माधवसिंग राजपूत,धाराशिव प्रतिनिधी जयनारायण दरक,माधवसिंग राजपुत,सौ.सरस्वती आडसूळ,सौ.महादेवी आडसूळ,सौ.शांता दरक आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!