धाराशिव (जिमाका) – इतर मागास बहुजण कल्याण विभागामार्फत व्हीजेएनटी,ओबीसी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी योजना,राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना व व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या विविध योजनांचा लाभ ऑनलाईन महाडीबीटी प्रणालीद्वारे दिला जातो. शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज मोठ्या प्रमाणात विद्यार्थीस्तर, महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरिता 30 एप्रिल 2024 पर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांनी महाडीबीटी ऑनलाईन प्रणालीवरील विद्यार्थी तथा महाविद्यालय लॉगिनवर प्रलंबित असलेल्या अर्जापैकी शासन निर्णय 1 नोव्हेंबर, 2003 व वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयान्वये पात्र ठरणारे अर्ज तात्काळ जिल्हास्तरावर पाठविण्यात यावे. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत असे अर्ज विद्यार्थी लॉगिनला परत पाठवून विद्यार्थ्यांना त्याबाबत अवगत करावे.अर्जांची 29 एप्रिल 2024 पर्यंत त्रुटी पुर्तता करुन जिल्हास्तरावर मान्यतेस्तव पाठविण्यात यावे.प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्याकरिता 30 एप्रिल 2024 पर्यंत मुदतवाढ प्रदान करण्यात आली आहे.प्रलंबित अर्ज विहित मुदतीत निकाली न काढल्यास असे अर्ज महाडीबीटी प्रणालीतून कायमस्वरुपी रद्द (Auto Reject) होतील.त्यामुळे विद्यार्थी लॉगिन तथा महाविद्यालय लॉगिनवर अर्ज प्रलंबित राहिल्याने एखादा विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहील.तरी सन 2023-24 व त्यापूर्वीचे प्रलंबित महाविद्यालयीन स्तरावरील पात्र अर्ज संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी 29 एप्रिल 2024 पूर्वी जिल्हास्तरावर पाठवावेत.जेणेकरून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल,असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणाचे सहाय्यक संचालक बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला