तुळजापूर (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – देशासमोरची जी स्थिती आहे.त्यातून आज तुम्ही-आम्ही जागे झाले नाहीत तर उद्या अनेक संकटांना तोंड द्यावे लागणार आहे. देशात महागाई आणि सत्तेचा गैरवापर वाढला आहे. चांगले काम करणाऱ्यांना जेलमध्ये टाकले जात आहे. त्यांना आता त्यांची जागा दाखवा, असे आवाहन खा. शरद पवार यांनी बुधवारी तुळजापूर येथून केले. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासाठी पवार यांनी बुधवारी तुळजापुरात सभा घेतली.
ते म्हणाले, दिल्ली देशाची राजधानी आहे. तीनदा मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल यांनी शिक्षण व इतरही मूलभूत सुविधा सुधारल्या. असे काम करणाऱ्या केजरीवाल यांना मोदींनी सत्तेचा गैरवापर करून जेलमध्ये टाकले. गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेलचे दर वाढविले. सर्व सामान्य माणसाचा संसार आणि व्यवहार दिवसेंदिवस अवघड होऊन बसला आहे. २०१४ पूर्वी ४३० रुपयांना मिळणारे गॅस सिलिंडर आज ११६७ रुपयांचे झाले आहे. महागाई कमी करू म्हणून सत्तेत आलेल्या लोकांनी काय करून ठेवले आहे, याचा विचार आता केला पाहिजे. धाराशिव जिल्ह्याशी माझे संबंध आहेत. डॉ.पद्मसिंह पाटील यांना मी साथ, बळ दिले. जिल्हा विकासात पुढे जावा हीच इच्छा होती. मात्र, इथे आल्यावर कळले की इथे काही झालेच नाही. इथे सामन्यासाठी करावयाची कामे मुंबईत केली गेली. त्यामुळे आता निर्धार करा व मशालीस साथ द्या, असे आवाहन पवार यांनी केले.
More Stories
श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या अफवा खोट्या
बोरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कविता कांबळे यांची बिनविरोध निवड
नळदुर्ग येथील कन्या प्रशालेत यशस्वी विद्यार्थिनींचा गौरव