February 8, 2026

पी एम श्री कन्या प्रशाला तुळजापूरच्या मुलींचा जिल्हा क्रीडांगणावर झंकार — तीन संघ विभागीय पातळीवर दाखल!

  • तुळजापूर – सैनिकी विद्यालय,तुळजापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पी एम श्री जिल्हा परिषद कन्या प्रशाला, तुळजापूर येथील विद्यार्थिनींनी आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.या विद्यार्थिनींनी केवळ वैयक्तिकच नव्हे तर सांघिक प्रकारातही जिल्हास्तरावर चमक दाखवत विभागीय स्तरावर तीन संघांची निवड करून शाळेचा मान उंचावला आहे.
    तुळजापूर व धाराशिव क्रीडा संकुलात झालेल्या मैदानी स्पर्धांमध्ये सॉफ्ट टेनिस प्रकारात कुमारी गार्गी पलंगे हिने प्रथम तर वैष्णवी जाधव हिने द्वितीय क्रमांक पटकावला.थाळीफेक प्रकारात ऐश्वर्या पवार हिने प्रथम क्रमांक मिळवत विभागीय स्तरासाठी पात्रता मिळवली.
    सांघिक क्रीडा प्रकारात 14 वर्षाखालील सॉफ्टबॉल,बेसबॉल तसेच 17 वर्षाखालील बेसबॉल संघांनीही जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे.
    या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक एल.बी.गाडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. भूमकर मॅडम व सदस्यांनी विद्यार्थिनींचे तसेच क्रीडा मार्गदर्शक प्रशांत काळे व विष्णू दळवी यांचे अभिनंदन करून विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
    शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा यामुळेच हे यश शक्य झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले असून पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
error: Content is protected !!