धाराशिव – दिनांक २२ एप्रिल २०२४ रोजी “भारतीय दलित ऐक्य कृती समिती ” च्या वतीने महाराष्ट्रामध्ये भूमिहीन कुटुंबांना सरसकट (जात विरहित) पाच एकर गायरान जमीन मिळावी हा उद्देश अंगीकारून धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अध्यक्ष तथा धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ.रमेश बनसोडे, आदिवासी समाजाचे महाराष्ट्राचे नेते प्रेमदास कुंबरे,महाराष्ट्र संपर्कप्रमुख जनार्दन वाळवे उपस्थित होते. या बैठकीमध्ये सर्व जिल्हास्तरीय पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये सर्वानुमते एक मत होऊन सौ. रेश्माताई सुरज पवार यांना धाराशिव जिल्हा संघटक या पदावर नेमणूक करण्यात आली. यावेळी धाराशिव महिला तालुका कार्याध्यक्ष सौ.मैनाताई रणदिवे, भुमीहीन योद्धा राजाभाऊ शिंदे, शांताई गवळी,काशीबाई डक, जयमाला पेठे,श्रीमंत वाघमारे, रेश्मा बगाडे,अर्चना तुपेरे,छाया सावंत सह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार अमोल सदाफुले यांनी मानले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला