August 8, 2025

देविदास सोनवणे गुरुजींचा ८५ वा अभिष्ठचिंतन सोहळा उत्साहात साजरा

  • धाराशिव – नगर पालिकेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक देविदास आप्पाराव सोनवणे गुरुजी यांचा ८५ वा अभिष्ठचिंतन सोहळा दि. १८ एप्रिल २०२४ रोजी हॉटेल जत्रा येथे साजरा करण्यात आला. तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्प वाहून प्रतिमा पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर पृथ्वीराज चिलवंत यांनी सामुदायित बुध्द वंदना घेतली.
    सोनवणे गुरुजींनी सेवेत असतानाही सामाजिक बांधिलकी जपत, सामाजिक कार्य केले आहे. गंगापूर येथे असताना महिला अत्याचारास वाचा फोडल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेवून पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची ठाप टाकली होती.सेवेत असताना त्यांनी सामाजिक कार्य केले आहे. समाजातील जुन्या चालिरिती प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले.यावेळी ते म्हणाले की, सध्याच्या काळात नाती टिकवायचे असतील तर प्रत्येकाने थोडासा त्याग करावयास शिकले पाहिले. यावेळी नितीन सोनवणे, मुकुंद गायकवाड, हर्षद बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशांत सोनवणे यांनी केले. यावेळी प्रशांत वाघचौरे,सिध्दांत सोनवणे, डॉ.अजित गायकवाड,आदर्श गायकवाड,अखिलेश जाधव, सुनिल बनसोडे,अजय धावारे, सुमेध सावंत,शौर्य सावंत, बालाजी शिंदे,अजय सोनवणे, आदित्य सोनवणे,ऐश्वर्या सोनवणे, शरद सावंत,अभिजीत सोनवणे, अजित बनसोडे,ज्योत्स्ना गायकवाड,कल्पना सोनवणे, वौशाली सोनवणे,ज्योती गायकवाड, सृष्टी सोनवणे, संचिता गायकवाड,आम्रपाली लांडगे,संध्या सावंत,अंकिता सोनवणे,माधुरी सोनवणे,सिंधू सोनवणे,पद्मीन सोनवणे,कुसुम गोरे,प्रणिता,अनुष्का गायकवाड, अपूर्वा गायकवाड,विजया बनसोडे आदिंची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहूल जगताप यांनी केले.
error: Content is protected !!