कळंब – कळंब येथील न्यायालयीन सेवानिवृत्त अधीक्षक मोहन तुकाराम कोलांगडे (५९) यांचे कळंब येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दिनांक २३ एप्रिल २०२४ रोजी दुःखद निधन झाले. मोहन कोलांगडे हे न्यायालयीन सेवेतून अधीक्षक म्हणून गतवर्षी सेवा निवृत्त झाले होते.धाराशिव न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.कर्मचारी व मित्र परिवारात तात्या म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी ,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर मांजरा काठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले .
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले