August 9, 2025

राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सत्कार

  • लातूर (दिलीप आदमाने ) – महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील विजेते खेळाडू बाळासाहेब जमादार, आकाश गड्डे व माऊली महानवर यांचा प्रत्येकी पाच किलो तूप खुराक म्हणून देऊन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
    यावेळी उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. नल्ला भास्कर रेड्डी, क्रीडा शिक्षक प्रा.आशिष क्षीरसागर, विष्णू तातपुरे आणि पालक नवनाथ धायगुडे यांची उपस्थिती होती. यावेळी हनुमान जन्मोत्सवानिमित्त हनुमान प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली.
    दिल्ली येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी खेळाडू बाळासाहेब जमादार प्रथम तर स्व. खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा, उदगीर येथील स्पर्धेत ५७ किलो वजन गटात आकाश गड्डे द्वितीय व ८२ किलो वजन गटात माऊली महानवर द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
    यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई,उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे आणि क्रीडा विभाग प्रमुख डॉ.नल्ला भास्कर रेड्डी यांनी प्रोत्साहनपर मार्गदर्शन करून खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आशीष क्षीरसागर व आभार प्रदर्शन विष्णू तातपूरे यांनी मानले.
    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील खेळाडू महेश तातपूरे, तुकाराम महानवर, प्रल्हाद राठोड, समाधान भोसले, कार्तिक धायगुडे, गुरुनाथ वाडकर, नारायण मुंडे, वेदांत मुंडे, श्रेयश शेळके, केदार शेळके, गोविंद शिंदे, बाळासाहेब शिंदे, शिवराज हाके, आदित्य शिंदे, स्वराज सावरे, देवराज दूधअंबे, सतीश मामाळे, शिवदर्शन पाटील, अनिकेत येलमटे, सगुण शेंडगे, प्रशांत सुरवसे आणि भीमाशंकर सुगरे यांनी सहकार्य केले.
error: Content is protected !!