लातूर (दिलीप आदमाने ) – दि.०१ एप्रिल महाविहार धम्म संस्कार केंद्र, सातकर्णी नगरचे सर्वेसर्वा धम्म गुरु पू.भिक्खू पय्यानंद थेरो यांना बौध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पू. भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत समाजातील श्रद्धावंतानी एकत्रित येऊन चार चाकी वाहन दान देण्यात आले आहे. अखिल भारतीय भिक्खू संघांचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष पू. भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पू.भिक्खू पय्यानंद थेरो हे गेल्या अनेक वर्षापासून लातूर जिल्हा व शहरात बौध्द धम्माचा प्रभावीपणे प्रचार व प्रसार करतात. यामध्ये ऐतिहासिक भिक्खू संघ दान सोहळा, महाविहार सातकर्णी नगर धम्म केंद्र निर्मिती, अखिल भारतीय बौध्द धम्म परिषदेचे आयोजन, सामूहिक महाबुद्ध वंदना कार्यक्रम, दर रविवार, चलो बुद्ध विहार अभियान, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक इत्यादी क्षेत्रात सातत्याने उल्लेखनिय कार्यक्रम भिक्खू पय्यानंद थेरो हे नेहमी राबवित असतात. त्यासाठी लातूर जिल्ह्यात परिभ्रमण करण्यासाठी समाजातील निष्ठावंत आणि श्रद्धावंत बौध्द उपासक-उपासिका यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर येथे सर्व दान दात्याच्या समक्ष चार चाकी वाहन भेट देण्यात आले आहे. यासाठी भंते बुध्दशील, डॉ. जि. के. डोंगरगावकर (मुंबई), इंजि. संजय सावंत, परमेश्वर आदमाने, प्राचार्य डॉ. संजय गवई, प्रा. देवदत्त सावंत, विजय मस्के, प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे, आत्माराम मोरे, अन्तेश्वर थोटे, आशा चिकटे, वैशाली गायकवाड, पांडुरंग अंबुलगेकर, प्रा. शान्तिक कुरे, बादल कांबळे, पंचशीला बनसोडे, ज्ञानेश्वरी बटवाड, मुकुंद वाघमारे, सुदाम बामणीकर, शकुंतला नेत्रगांवकर, अनिता तेलगावकर, बेबी कांबळे, वसंत वाघमारे, सुधाकर कांबळे, के.एल.सिरसाट, भगवान नरवाडे, उदय सोनवणे, मोहन शृंगारे, राहुल शाक्यमुनी, भीमराव चौदंते, बाबुराव गायकवाड,ऍड. सुनिल कांबळे, संतोष कसबे, ज्योती वानखेडे, संजय राऊत, अरुण गायकवाड, विठ्ठल आदमाने, डॉ. वैशाली इंगोले, ज्योतीराम लामतुरे, गौतम जेवरीकर, अनुरथ वाघमारे, अक्षय गायकवाड, अरविंद शिंदे, बालिका कांबळे, संजय कांबळे यांनी एकत्रित येऊन चार चाकी वाहनासाठी आर्थिक मदत केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, लातूर येथे प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन पू. भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भिक्खू पय्यानंद थेरो यांच्याकडे चार चाकी वाहनाची चावी सुपूर्त करण्यात आली. यावेळी ऍड. बाबासाहेब गायकवाड, बसवंत उबाळे, प्रा.यु.डी.गायकवाड, डी.एस.नरसिंगे, डॉ. विजय अजनीकर, डॉ. सुधाकर गुळवे, प्रा. शिवशरण हावळे, विश्वनाथ आल्टे, अशोक कांबळे, डॉ. सुनिल होळीकर, उत्तम कांबळे, राजु आर्वीकर, सूर्यकांत कालेकर, ज्ञानेश्वर सुरवसे, प्रा.कल्याण कांबळे, रमेश शृंगारे, विनायक बोरीकर, शोभा सोनकांबळे, श्यामल कांबळे, मीना कदम, प्रा. मा. ना. गायकवाड, सुजाता अजनीकर, रेखा सुरवसे, सरिता बनसोडे, सुमन उडानशिव यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते. यावेळी पू. भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते पंडित सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंडीत सूर्यवंशी, बालाजी धायगुडे, सतिश कांबळे, डॉ. अरुण कांबळे, विशाल वाहुळे, निलेश बनसोडे, अविनाश आदमाने, अनिरुद्ध बनसोडे, मिलिंद धावारे यांनी परिश्रम घेतले.
More Stories
अटल टिंकरिंग लॅब प्रकल्प प्रदर्शनात जिजामाता विद्यालयाची चमकदार कामगिरी; जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक
सामाजिक कार्यासाठी सुफी सय्यद शमशोद्दीन यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव
“बौद्ध धम्म हा समतेचा मार्ग” – भिक्खू पय्यानंद थेरो