धाराशिव – जिल्हा पत्रकार संघाचे विश्वस्त,पत्रकार रवी केसकर यांचे दि.१ एप्रिल २०२४ रोजी रात्री ८ वाजता अपहरण करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. केसकर काम आटोपून घरी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अमर पॅलेस ते साळुंके नगर बेंबळी रोड या भागात मारहाण करण्यात आली. चाकू हल्ल्याने त्यांच्या चेहऱ्यावर जखम झाली आहे. केसकर या हल्ल्यातून बालंबाल बचावले आहेत. त्यांची गाडी चोरून नेण्यात आली. ही गाडी तुळजापूर रोडवर वडगाव शिवारात आढळून आली. याप्रकरणी पलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी यंत्रणेला तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, हल्ल्याचा प्रयत्न का झाला, या मागचे सूत्रधार कोण आहेत, पत्रकारांना टार्गेट केले जातेय का, असे प्रश्न निर्माण होत आहेत. पोलिसांनी घटनेची तक्रार नोंदवून घेतली आहे. या घटनेचा सा.साक्षी पावनज्योत परिवार व व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग कळंबच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान