धाराशिव (जिमाका) – 7 मे 2024 रोजी 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराच्या पॅम्प्लेट्स, पोस्टर्स व फ्लेक्स यासह अन्य प्रचार साहित्यावर मुद्रक आणि प्रकाशकाची नावे आणि पत्ते असले पाहिजेत.दस्तऐवज मुद्रित केल्यानंतर वाजवी वेळेत,प्रकाशकाच्या ओळखीच्या घोषणेची एक प्रत एकत्र असावी. दस्तऐवजाची प्रत मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवावी लागणार आहे. ज्यामध्ये ते छापले आहे.या तरतुदीचे कोणतेही उल्लंघन केल्यास सहा महिन्यांपर्यंतच्या कारावासाची किंवा दंडाची,जी दोन हजार रुपयांपर्यंत वाढू शकते,अशा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. मुद्रित माध्यमांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या बाजूने किंवा विरुद्ध जाहिरात निवडण्याच्या प्रकरणाच्या बाबतीत,निवडणूक काळात,प्रकाशकाचे नाव आणि पत्ता प्रकरण/जाहिरातीसोबत द्यावा,असे निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत.याबाबत असलेल्या कायदयाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. कायद्यातील तरतुदी आणि या संदर्भात आयोगाच्या निर्देशांच्या अंमलबजावणीस जबाबदार असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याने त्याच्या कर्तव्याचे योग्य पालन करण्यात कसूर केल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाईशिवाय कठोर शिस्तभंगाची कारवाईची तरतूद आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी याबाबतच्या आदेशातील मजकूर सर्व प्रिंटिंग प्रेसच्या निदर्शनास लिखित स्वरूपात आणून दिला आहे.उमेदवार आणि राजकीय पक्षांनी पोस्टर्स, पॅम्प्लेट इत्यादी छापण्यासंबंधी कायद्यातील तरतुदीचे पालन करावे.असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला