August 8, 2025

पंडित कांबळे यांच्या कविता संग्रहास नामदेव ढसाळ पुरस्कार प्रदान

  • धाराशिव (प्रा.अविनाश घोडके) – जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा दहावा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण समारंभ दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी मधुरम सभागृह,झाशी राणी चौक,सीताबर्डी,नागपूर येथे पार पडला.भारतातील अनेक लेखकांना व समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मंडळींना राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन ही संस्था दरवर्षी सन्मान करते. यावर्षी पंडित कांबळे यांच्या ‘पेटलेल्या शहराच्या कल्लोळात’ या कवितासंग्रहास नामदेव ढसाळ राज्यस्तरीय पुरस्कार सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन श्रीपाल सबनीस,डॉ.वैशाली प्रधान,डॉ. सुनील रामटेके,डॉ.विद्याधर बनसोड यांच्या हस्ते पंडित कांबळे यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.दीपक कुमार खोब्रागडे, डॉ.रवींद्र तिरपुडे,अँड.भुपेश पाटील, डॉ. अनिल काळबांडे,डॉ.शंकर चांदेकर, प्रा.काजल गायकवाड यावेळी मंचावर उपस्थित होते.
    पंडित कांबळे हे नगरपरिषद शाळा क्रमांक १४ धाराशिव येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करतात. त्यांचे आतापर्यंत कविता संग्रह, बालकविता संग्रह, संपादित ग्रंथ, समीक्षा अशी ११ पुस्तके प्रकाशित आहेत. अनेक लेख व कविता अनेक संपादित ग्रंथात प्रकाशित आहेत. अनेक कवितांचा हिंदी अनुवाद प्रकाशित झालेला आहे. त्यांच्या ‘पेटलेल्या शहराच्या कल्लोळात ‘ कवितासंग्रहाला यापूर्वी देवकाई राज्यस्तरीय पुरस्कार, आर्वी, जिल्हा वर्धा. शब्दांगण साहित्य पुरस्कार, चंद्रपूर हे मिळालेले आहेत. तसेच नुकताच त्यांना यवतमाळ येथे ‘संगराच्या पायवाटा’ राज्यस्तरीय पुरस्कार त्यांच्या बालसाहित्यातील काम व साहित्य सेवेबद्दल मिळालेला आहे. विविध संस्थांचे या वर्षात त्यांना विविध पुस्तकांना आठ नामांकित पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातील लोकांकडून अभिनंदन होत आहे.
error: Content is protected !!