August 8, 2025

स्वराज तोडकर यांची नवोदयसाठी निवड

  • कळंब – तालुक्यातील हसेगाव केज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी कुमार स्वराज ज्ञानेश्वर तोडकर याची जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथे पुढील शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. स्वराज तोडकर ला नवोदयला मार्गदर्शन करणारे त्याचे वडील सावित्रीबाई फुले विद्यालय कळंबचे सहशिक्षक ज्ञानेश्वर तोडकर,रघुकुल नवोदय ऑनलाइन क्लासेस लातूर चे अश्विनी घुले, स्वाती घुले, दिपाली नेहरकर तसेच जिल्हा परिषद शाळेतील गुंजाळ, घुटे तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद, त्याचबरोबर युनिक क्लासेसचे शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
    त्याच्या या यशाबद्दल त्याच्या सर्वत्र कौतुक होत आहे.
error: Content is protected !!