August 8, 2025

नवोदय परिक्षेत पाथर्डी शाळेचे यश

  • कळंब – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी शाळेची विद्यार्थिनी कु.वैष्णवी बालाजी चिंचकर हिची निवड नवोदय विद्यालय तुळजापूर येथे झाली आहे.वैष्णवी ही पाथर्डी गावचे पोलिस पाटील बालाजी चिंचकर यांची मुलगी आहे.या यशाबद्दल सरपंच नानासाहेब पिंगळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीकांत पिंगळे,माजी सरपंच अर्जुन जाधव, मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड , सहशिक्षक धनंजय गव्हाणे, मनिषा पवार, सुरेखा भावले, सरोजिनी पोते, शिक्षण प्रेमी नागरीक,ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.या यशाबद्दल‌ वैष्णवी व तिच्या आई वडिलांचा मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, उपक्रमशिल शिक्षक धनंजय गव्हाणे,निशिकांत आडसुळ, सुमित बलदोटा, दिलीप डोईफोडे यांनी सत्कार केला.
error: Content is protected !!